शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

सिंदी (रेल्वे) तालुका निर्मितीचा आमदाराचा प्रस्ताव

By admin | Updated: August 22, 2015 02:33 IST

पुलगावला तालुक्याचा दर्जा द्यावा, ही मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू असताना सिंदी(रेल्वे) ला सुद्धा तालुक्याचा दर्जा द्यावा, ...

महसूल मंत्रालयाकडे प्रकरण पाठविण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचनावर्धा : पुलगावला तालुक्याचा दर्जा द्यावा, ही मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू असताना सिंदी(रेल्वे) ला सुद्धा तालुक्याचा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव गुरुवारी हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आ. समीर कुणावार यांनी अर्थ व नियोजन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मांडला. यावर ना. मुनगंटीवार यांनी ही बाब महसूलशी संबंधित असल्याचे सांगून सदर प्रस्ताव सदर विभागाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या. ना. मुनगंटीवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शासकीय दौऱ्यांच्या अंती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. याप्रसंगी सिंदी(रेल्वे) तालुका निर्मितीचा विषय आधी पासूनच पटलावर होता. या अनुषंगाने आ. समीर कुणावार यांनी सिंदी(रेल्वे)ला नवा तालुका म्हणून का घोषित करावा, ही बाब सविस्तर अहवालाच्या माध्यमातून पटवून दिली. याबाबत मुनगंटीवार यांनी सकारात्मक विचार करीत सदर बाब राज्याच्या महसूल विभागाच्या अखत्यारित येत असल्यामुळे हा प्रस्ताव महसूल विभागाला पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आली.(जिल्हा प्रतिनिधी)पुलगाव तालुक्याची मागणी धूळ खातपुलगावला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी सन १९७८ पासून धूळखात आहे. तब्बल ३७ वर्षानंतर पुलगाव तालुका होईल याची शाश्वती नागरिकांना नाही. त्यामुळे तालुका घोषित करण्याची मागणी होत आहे.गत वर्षी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपाने महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आल्यास तीन महिन्यांत पुलगावला तालुका घोषित करू अन्यथा राजकारण सोडू असे जाहीर केले होते. राज्यात भाजपाची सत्ता येऊन वर्ष उलटले तरी अद्याप कुठलीही हालचाल दिसत नसल्याने जनतेच्या पदरी निराशा आली आहे.देवळी तालुक्यातील २४ गावे, वर्धा तालुक्यातील सात गावे तसेच आर्वी तालुक्यातील काही गावे समाविष्ट होतात. हिंगणघाट तालुक्यातील तीन गावे देवळी तालुक्यात जोडली आहेत. तालुक्यात ४८ गावे आहेत. पुलगाव तालुका झाल्यास यातील अनेक गावे शहरास जोडली जातील. त्यामुळे आजूबाजूच्या अनेक ग्रामस्थांना कामकाजासाठी सोईचे जाईल. तसेच वेळ आणि पैशाचा उपव्यय थांबेल. कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ते कामाचा भार कमी होईल. परिणामी प.सं. तहसील संबंधातील कामासाठी ताटकळत राहावे लागणार नाही.