शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगावर झालेल्या लाठीचार्जचा प्रहारकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:26 IST

पुणे येथील आयुक्त कार्यालयात दिव्यांग बांधवांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. याचा निषेध नोंदवत दोषींवर आर.पी.डब्लू.डी.अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रहार संघटनेच्यावतीने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुणे येथील आयुक्त कार्यालयात दिव्यांग बांधवांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. याचा निषेध नोंदवत दोषींवर आर.पी.डब्लू.डी.अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रहार संघटनेच्यावतीने केली आहे. या मागणीचे अपर जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.कर्णबधीर दिव्यांगावर पुणे दिव्यांग आयुक्त कार्यालयात बाहेर लाठीचार्ज करण्याचा अधिकार कुणी दिला. ज्या मुलांना काही बोलता व ऐकता येत नाही, अशा निष्पाप तरुणांवर लाठीचार्ज करुन या सरकारला व प्रशासनाने काय साध्य केले, असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे. कर्णबधीर मुलांना सांकेतिक भाषेत समजावून सांगणे, हे पोलिसांचे कर्तव्य होते. पण, पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले नाही. त्यामुळे दोषींवर आर.पी.डब्ल्यू.डी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा.या कर्णबधीर दिव्यांगाना बोलता व ऐकता येत नाही, हे माहिती असुनही पोलिसांना लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? दिव्यांगाना नोकरी आणि शिक्षण मिळणे हा त्यांचा अधिकारच आहे, अशा आशयाचे निवेदन अपर जिल्हाधिकारी संजय दैने यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आले.निवेदन देताना प्रहारचे वर्धा शहर प्रमुख विकास दांडगे यांच्या नेतृत्वात शुभम भोयर, नितेश चातुरकर, भुषण येलेकार, दादा बोरकर, नितीन काटकर, शैलेश कोसे, वैभव शेंडे, हरिष डोंगरे, सचिन कोळसे, आदित्य कोकडवार, प्रशिल धांदे, पवन दंदे, श्याम शेलार, विक्रम येलेकार यांच्यासह प्रहार संघटनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.