शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीवरील आमदारांच्या भूमिकेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:21 IST

दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीकडे पोलीसही दुर्लक्ष होत असून याबाबत जिल्ह्यातील आमदार दारू खुली करण्याचे समर्थन करीत आहेत. हा प्रकार निंदनीय आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गुरूवारी सेवाग्राम आश्रमात आत्मचिंतन सभा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीकडे पोलीसही दुर्लक्ष होत असून याबाबत जिल्ह्यातील आमदार दारू खुली करण्याचे समर्थन करीत आहेत. हा प्रकार निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. पोलीस प्रशासनासह आमदारांना सद्बुद्धी मिळो व त्यांच्याकडून दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न व्हावे या मागणीसह सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी दारूबंदी महिला मंडळाने केली आहे.तसे निवेदनही मंगळवारी उपजिल्हाधिकारी कदम यांना देण्यात आले आहे. पोलीस प्रशासनासह आमदारांना सद्बुद्धी मिळो व त्यांच्याकडून दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता प्रयत्न व्हावे, या मागणीसाठी गुरूवारी (२८ डिसेंबर) सेवाग्राम बापुकुटीतील यात्री निवासात दुपारी १२ वाजता आत्मचिंतन सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकाºयांनी दारूबंदीवर डोळेझाक केल्याचे चित्र आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी दारूबंदीच्या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. नवीन पोलीस अधीक्षक आल्यापासून पाहिजे तशी दारूबंदीची अंमलबजावणी करण्यात आली नाही. दारूविक्रीमुळे गावातील शांतता भंग होत आहे. शिवाय गावात छोटे-मोठे तंटे होत आहेत. त्यातच आमदारांकडून वर्धा जिल्ह्यातून दारूबंदी हटविण्या संदर्भात समर्थन केले जात आहे. हा प्रकार जिल्ह्यात गुन्हेगारीला खतपाणी देणाराच आहे. या प्रकरणी दारूबंदी प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागाने व राज्य उत्पादन शुल्क विभागाने योग्य कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना विरांगणा दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा झाडे, बेबी गेडाम, इंदु कोकाटे, गोविंदा पेटकर, उमेश कांबळे, मंगेश शेंडे, भारती मसराम, गीता कुंभरे, निर्मला पाठक, अंजना सयाम, वनिता भवरे, कुंदा कुबडे आदी हजर होते.