लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : येथील आठवडी बाजारातील व्यावसायिकांनी न.प. मुख्याधिकाºयांच्या व्यावसायिक विरोधी धोरणांच्या निषेधार्थ रविवारी आक्रमण भूमिकाच घेतली होती. यामुळे काही काळाकरिता परिसरात तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांच्या मध्यस्तीअंती व्यावसायिकांनी नमती बाजू घेतली. शिवाय परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे आठवडी बाजाराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.येथील आठवडी बाजारात बसणाºया व्यावसायिकांनी बाजाराच्या दिवस असलेल्या रविवारी सकाळी नगरपंचायत मुख्याधीकारी पल्लवी राऊत यांच्या धोरणांचा विरोध दर्शविण्यासाठी आपली दुकाने न लावणाचा निर्णय घेतला होता. काल ५ रोजी जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये स्वच्छता मोहीम राबवित असताना संध्याकाळी आठवडी बाजारातील कच्चे ओटे मुख्याधिकाºया आदेशावरून नगरपंचायतीच्या कर्मचाºयांनी जेसीबीच्या सहाय्याने तोडले. शिवाय त्यांना १० बाय १० ची जागा देत असल्याचे सांगण्यात आले. हे काम सुरू असताना माजी सरपंच शिरीष भांगे यांनी रविवार बाजाराचा दिवस आहे. हे काम सोमवार पासुन करावे, अशी विनंती केली. त्यानंतर नगरपंचायतचे उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर यांनीही कारवाईदरम्यान व्यावसायिकांची बाजू मांडली. परंतु, मुख्याधिकारी आपल्या निर्णयावर ठाम होत्या. आज सकाळी बाजारातील व्यापारी जेव्हा बाजारात येवू लागले तेव्हा ते पूर्वीच संतापले होते. त्यांनी थेट दुकाने न लावण्याचा निर्णय घेतला. शिवाय सर्व व्यावसायिकांनी एकत्र छाट्या व्यावसायिक विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. त्यानंतर मुख्याधिकारी राऊत, उपाध्यक्ष नितीन दर्यापुरकर यांनी आठवडी बाजार गाठले. त्यांनी व्यापाºयांना समजाविण्याचा प्रत्यन केला; पण व्यावसायिक आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे परिसरात तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. व्यावसायिकांची बाजू मोरेश्वर भांगे, माजी सरपंच गिरीष भांगे, शांताराम ठबाडे यांनी मांडली. त्यावर मुख्याधिकारी राऊत यांनी शुक्रवार ११ जानेवारीपर्यंत तोडलेले ओटे सुस्थितीत करून देण्याचे आश्वासन दिल्याने व्यावसायिकांनी नमती बाजू घेत दुकाने लावण्याचा निर्णय घेतला.आपण स्वत: मॅडमशी चर्चा केली. त्यांनी स्वच्छता अभियानाचे कारण पुढे केले. शिवाय व्यावसायिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले.- शिरीष भांगे, माजी सरपंच कारंजा (घा.).मला याबाबतीत कोणतीही माहिती नव्हती. तसेच बैठक असल्याने मी वर्धेला गेलो होतो. तेथून परतल्यावर झालेल्या घटनेची काही माहिती मिळाली. त्यानंतर आपण काम सुरू असताना सीओ मॅडमला ओटे तोडण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यांनी आपले काहीही एैकले नाही. ओटे तोडणार याची माहिती मला व नगराध्यक्ष कल्पना मस्की यांना माहिती नव्हती.- नितीन दर्यापूरकर, उपाध्यक्ष, नगरपंचायत कारंजा (घा.).स्वच्छ, सुंदर व विकसीत कारजा शहर या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही केवळ जागा मोकळी करणार होतो.- पल्लवी राऊत, मुख्याधिकारी, नगरपंचायत कारंजा (घा.).
मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात व्यावसायिक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:39 IST
येथील आठवडी बाजारातील व्यावसायिकांनी न.प. मुख्याधिकाºयांच्या व्यावसायिक विरोधी धोरणांच्या निषेधार्थ रविवारी आक्रमण भूमिकाच घेतली होती. यामुळे काही काळाकरिता परिसरात तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात व्यावसायिक आक्रमक
ठळक मुद्देदुकाने न लावण्याच्या कारणावरून परिसरात तणावाची स्थिती