शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वणा नदीवर होणार नवीन बंधाºयांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:24 IST

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वणा नदीवर तयार करण्यात येत असलेला बंधारा निकृष्ट कामामुळे नापास ठरला.

ठळक मुद्देजलसंकटावर होणार मात : आमदारांनी कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वणा नदीवर तयार करण्यात येत असलेला बंधारा निकृष्ट कामामुळे नापास ठरला. आता नवीन बंधारा बांधण्याच्या दृष्टिकोनातून निधी आणण्यासाठी आ. समीर कुणावार यांनी कंबर कसल्याचे दिसते.शहराला बारमाही पाणी पुरवठा करण्यासाठी शहरालगत वाहणारी वणा नदी वरदान ठरली. हिंगणघाट येथे नदीचे पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने उन्हाळ्यातील दोन महिने शहरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. लाखो रुपये खर्च करुन धरणाचे पाणी विकत घेऊन पाणी पुरवठा करण्याची कसरत करावी लागते. पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने हा निरर्थक खर्च होतो. सन २०१० मध्ये वणा नदीचे पाणी अडविण्यासाठी शासनस्तरावर ५ कोटींचा बंधारा मंजूर झाला. बंधाºयासाठी आलेला निधी खर्च होऊन गेला तरी बंधाºयाचे काम अर्धवट राहिले. उन्हाळ्यातील पाणी समस्या लक्षात घेता आ. कुणावर यांनी अर्धवट बंधाºयाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडे वाढीव निधीकरिता पाठपुरावा सुरू केला. दरम्यान अर्धवट बंधाºयाच्या घोळा संदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्ते उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर घडलेल्या घडोमोडीतून या अर्धवट बांधलेल्या बंधाºयाची गुणवत्ता परीक्षण विभागाकडून चाचणी करण्यात आली. या चाचणीत ७२ नमून्यापैकी ४० नमूने निकृष्ट ठरविण्यात आले. त्यामुळे आ. कुणावार यांच्या वाढीव निधीच्या मागणीला ब्रेक लागला. दरम्यान हिंगणघाट शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी ६१ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्यातून शहरामध्ये ११ नवीन पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, १८५ कि़मी. ची नवीन पाईप लाईन, नवीन पंपींग मशीन, असा सगळा मोठा डोलारा उभा राहणार असून त्याचे काम सुरू झाले आहे. शहरात पाच जलकुंभ असून उन्हाळ्यात नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत होते. नवीन बंधारा नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.नवीन बंधारा होणारच : समीर कुणावारआमदार कुणावार यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेतली असता उन्हाळ्यात शहरवासीयांना पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून आपण सध्या अपूर्ण व्यवस्थेत असणाºया बंधाºयावर वाढीव निधी मिळून तो बंधारा पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी केली होती. शासनाकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. गुणवत्ता चाचणीत या बंधाºयाचे झालेले काम निकृष्ट प्रतीचे निघाल्याने आता या बंधाºयाच्या कामासाठी वाढीव निधी मिळूच शकत नाही. अशातच अमृत योजनेचे महत्त्वाकांक्षी काम पूर्ण झाल्यानंतर पाणी संचय क्षमता आतापेक्षा खूप जास्त वाढणार आहे. परंतु, अडतच नाही तर शहरात आणणार कोठून, अशी सध्याची स्थिती आहे. याची जाणीव आपण मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना दिली. त्यानुसार मंत्रालयात नवीन बंधारा बांधण्याच्या दृष्टीकोनातून तीन बैठकी झाल्या. लवकरच या कामासाठी निधी उपलब्ध होईल, असे आ. समीर कुणावार यांनी सांगितले.