शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दोन एकरांत घेतले तब्बल १८ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 09:22 IST

Wardha news आर्वी तालुक्यातील दौलतपूर येथील युवा शेतकरी सुरेश वसंत कदम याने जानेवारीच्या ३१ तारखेला सोयाबीन लावले आणि केवळ दोन एकरांत सोयाबीनचे १८ क्विंटल उत्पादन घेतले.

ठळक मुद्देसोयाबीनच्या भरघोस उत्पन्नामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांना या बियाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सुरेश कदम यांनी सोयाबीन मार्केटमध्ये न नेता शेतकरी बांधवांना बियाण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कृषी अधिकारी व अनेक शेतकऱ्यांनी कौतु

वर्धा  : मागील हंगामात नापिकी झाल्याने त्रस्त शेतकऱ्याने खचून न जात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दोन एकरात तब्बल १८ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले असून, युवा शेतकऱ्याच्या शेतातील पीक पाहण्यासाठी कृषितज्ज्ञ अधिकारी आणि शेतकऱ्यांनी शेतीची पाहणी करीत भेट दिली.

उन्हाळी सोयाबीनचे उत्पन्न शेतकरी अल्प घेतात. कारण त्यात उत्पादन न होण्याची भीती असते. सर्व खर्च वाया जात असल्याने शेतकरी पावसाळ्यातच जून, जुलै महिन्यांत नगदी पीक म्हणून सोयाबीनचे उत्पन्न घेतात. मात्र, यावर्षी कापूस, सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांची चांगलीच वाताहात केली होती. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. आर्वी तालुक्यातील दौलतपूर येथील युवा शेतकरी सुरेश वसंत कदम याने जानेवारीच्या ३१ तारखेला सोयाबीन लावले आणि केवळ दोन एकरांत सोयाबीनचे १८ क्विंटल उत्पादन घेतले. परिसरात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला भेट देत सोयाबीन पेरणीसाठी आम्हाला द्या, असा तगादा लावला.

सुरेश कदम असे यांची दौलतपूर शिवारात सहा एकर शेती आहे. त्यात त्यांनी उन्हाळी सोयाबीन लावले होते. त्यापूर्वी कापूस आणि सोयाबीन पिकाने दगा दिल्याने या शेतकऱ्याचा खर्चही निघाला नव्हता त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. अखेर त्यांनी उन्हाळी सोयाबीन पीक घेण्याचा निर्णय घेतला. शेतातील पऱ्हाटी उपटून शेत स्वच्छ केले. दोन एकरांत गायत्री सीड्स आणि चार एकरांत दोन पुन्हा वेगवेगळ्या सोयाबीन व्हरायटीची पेरणी केली. यासाठी त्यांना एकरी दहा हजारांचा खर्च आला. मात्र चार एकरांत किडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन गेले. परंतु दोन एकरांत चांगले सोयाबीन झाल्याने त्यांना तारले.

सहा एकर सोयाबीनचे तीन प्लॉट लावले. तीन वेगवेगळ्या कंपनीचे सोयाबीन लावले. स्प्रिंकलरने त्यांना सातवेळा पाणी दिले. चारवेळा रासायनिक खते व फवारणी केली. कृषितज्ज्ञांनी पाहणी करून मार्गदर्शन केले.

गायत्री २०१९ आणि २०३४ या सोयाबीनने दोन एकरांत १८ क्विंटल उत्पादन दिले, उर्वरित चार एकरांत चार क्विंटल सोयाबीन झाले आहे. हे सोयाबीन बाजारात न विकता परिसरातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणासाठी देणार आहे.

सुरेश वसंत कदम, युवा शेतकरी, देऊरवाडा

 

............................

टॅग्स :agricultureशेती