लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महानुभाव संप्रदायाच्यावतीने द्वी-दिवसीय संत संमेलन, अपुर्व, भेटकाळ पर्व, अनुसरण विधी तथा पंचावतार उपहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शनिवारी शहरातून पालखी-मिरवणूक काढण्यात आली. या पालखी-मिरवणुकीमुळे परिसरात भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली होती.बढे चौकातून काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीने शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केले. पालखी-मिरवणुकीची सांगता दत्तपूर परिसरातील नंदनगरी येथे झाली. रविवारी सकाळी ६ वाजता श्री मूर्तीस मंगलस्नान, सकाळी ७ वाजता गीतापाठ पारायण, सकाळी ८ वाजता ध्वजारोपण, सकाळी ८ वाजता भेटकाळ पर्व, सकाळी ९ वाजता धर्मसभा व अनुसरण विधी, दुपारी १२ वाजता पंचावतार उपहार व दुपारी १ वाजता महाप्रसाद होईल. शनिवारी शहरातून निघालेल्या पालखी-मिरवणुकीत महानुभाव संप्रदायाचे बांधव सहभागी झाले होते.तरुणाचा होणार स्वेच्छेने संन्यास धर्मप्रवेशसातारा जिल्ह्यातील फलटण येथील धर्मकुमार स्रेहल बाळासाहेब अहिवळे हा तरुण ब्रह्मविद्या तत्त्वज्ञानानुसार आपल्या स्वेच्छेने संन्यास धर्मात पदार्पण करीत आहे. हा सोहळा रविवारी पार पडणार आहे. त्या पूर्व संध्येला शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यात आचार्य गण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांचा समावेश होता. शनिवारी रात्री कळमकर बाबाजी गाडे यांचे कीर्तन झाले. रविवारी दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरवणुकीने दुमदुमली वर्धा नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:19 IST
महानुभाव संप्रदायाच्यावतीने द्वी-दिवसीय संत संमेलन, अपुर्व, भेटकाळ पर्व, अनुसरण विधी तथा पंचावतार उपहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरवणुकीने दुमदुमली वर्धा नगरी
ठळक मुद्देसंत संमेलन, अपूर्व भेटकाळ पर्व, अनुसरण विधी तथा पंचावतार उपहार