सांडपाण्याचा प्रश्न : कचरा व्यवस्थापनाचा बोजवारावर्धा : साटोडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या आलोडी भागातील देशमुख वॉर्डात विविध समस्यांनी कळस गाठला आहे; पण प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांडपाण्याचा प्रश्न उग्ररूप धारण करीत असून कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांची दुरुस्ती केलेली नाही. रस्त्याचा बाजुला कच्च्या नाल्या खोदल्या नाही. त्यामुळे सांडपाणी साचते. काही भागात असलेल्या नाल्यांची सफाई होत नाही. त्यामुळे सांडपाणी साचून डासांची उत्पत्ती होते. दुर्गंधी पसरली आहे. गौळकार यांच्या घराजवळील हातपंप दोन वर्षापासून बंद आहे. त्याची दुुरुस्ती झाली नाही. देशमुख वॉर्डातील ओपन स्पेसमध्ये नवीन हातपंपाची व्यवस्था करावी. तसेच उलके ते वडतकर यांच्या घरापर्यंत असलेल्या नालीवर ढोला टाकण्यात यावा. म्हणजे आवागमन सूकर होईल. ग्रा.पं. कर्मचारी आणि सदस्य यांना येथील समस्या सांगितल्या तर त्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते. देशमुखवाडी ते धुनिवाले चौकापर्यंत पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
देशमुख वॉर्डात समस्यांचे आगार
By admin | Updated: October 3, 2016 00:47 IST