शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार समीर कुणावार यांनी जाणून घेतल्या वर्ध्यातील संपकरी एसटी कर्मचा-यांच्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 15:07 IST

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचा-यांच्या समस्या आमदार समीर कुणावार यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हिंगणघाट (वर्धा ) - गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचा-यांच्या समस्या आमदार समीर कुणावार यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एसटी कर्मचा-यांच्या आंदोलन स्थळाला कुणावार यांनी भेट दिली व  त्यांच्या समस्या शासनदरबारी मांडण्याचे आश्वासनही दिले.  पदनिहाय वेतन श्रेणीसह सातव्या वेतन आयोगाचे मागणीकरीता संपूर्ण महाराष्ट्रात एस.टी. कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपात हिंगणघाट आगाराचे ३६० कर्मचारी सहभागी झाले असून एकूण ६८ नियते व तब्बल ४२६ फे-या रद्द झालेल्या आहेत.कुणावार यांनी  १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता हिंगणघाट एस.टी. आगारातील संपकरी कर्मचा-यांच्या मंडपास भेट दिली. यावेळी पं.स. सभापतील गंगाधर कोल्हे, भाजपा जिल्हा चिटणीस प्रा. किरण वैद्य उपस्थित होते. कामगार संघटनेचे आगार सचिव हितेंद्र हेमके, महाराष्ट्र मोटर कामगार संघाचे यशवंत डाखोरे, इंटकचे बाळू मैंद यांना एसटी कामगाराच्या विविध मागण्या आमदारांना अवगत करून समस्या मांडल्या. यावेळी आमदारांनी संपूर्ण मागण्यांचा आढावा घेवून गेल्या अनेक वर्षापासून कर्मचा-यांना तुटपुंज्या पगारावर उपजिविका करावी लागत असल्याचे मान्य करून त्यांचेवर अन्याय होत असल्याची कबुली यावेळी दिली. एस.टी. कर्मचा-यांच्या सर्व मागण्या या रास्तच असून त्यांच्या व्यथा शासनदरबारी मांडणार असल्याचे सांगितले. या आंदोलनाबाबात त्यांनी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री या आंदोलनावर लवकरच सकारात्मक तोडगा काढतील, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.मेंदूची शस्त्रक्रियास झाल्याने भविष्यात काम करण्यास असमर्थ असणारे हिंगणघाट एस.टी. आगारातील चालक वावरे यांनी आ. कुणावार यांनी त्वरित पुढील उपचाराकरीता १५ हजाराची रोख मदत दिली.  कुणावार यांनी एस.टी. कर्मचा-यांच्या आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेचे कर्मचा-यांनी समाधान व्यक्त करून लवकरच तोडगा निघेल,  अशी आशा व्यक्त केली.

टॅग्स :ST Strikeएसटी संप