शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसमोरील समस्याच सर्व असंतोषाच्या मुळाशी

By admin | Updated: November 12, 2016 01:13 IST

वर्षभरात केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभर निघालेल्या महामोर्च्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आलेत.

श्याम मानव : कृषीआधारित अर्थव्यवस्था व ‘स्वामिनाथन’ हाच पर्यायवर्धा : वर्षभरात केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभर निघालेल्या महामोर्च्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आलेत. या मोर्च्यांचे मानसशास्त्र जर सरकारने वेळीच ओळखले नाही तर येणारा काळ हा तीव्र संघर्षाचा असेल. असंतोषाच्या ज्वालामूखीचा भविष्यकाळात आकस्मिक विस्फोट होऊ नये, यासाठी कृषिआधारित व्यवस्था निर्माण करणे आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे, हाच पर्याय असल्याचे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.‘मराठा क्रांती मूक मोर्चामागील असंतोषाची मूळ कारणे’ या विषयावर घेण्यात आलेल्या जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. स्थानिक लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध परिवर्तनवादी सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या विषयावर प्रथमच आयोजित व्याख्यानात प्रा. मानव यांनी अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका मांडली. मंचावर प्रा. शेख हाशम, प्रा. जनार्दन देवतळे, अ‍ॅड. के.पी. लोहवे, अ.भा. अंनिसचे राज्य संघटक अ‍ॅड. गणेश हलकारे, महिला आघाडी प्रमुख छाया सावरकर, राज्यसचिव प्रशांत सपाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरीश इथापे, संघटक पंकज वंजारे यांची उपस्थिती होती. आंदोलनामुळे भविष्यकालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सहसंबंधावर होणाऱ्या परिणामांची मांडणी करताना प्रा. मानव म्हणाले, मराठा, जाट, पटेल, गुज्जर, माळी या सर्व शेतीवर निर्भर असणाऱ्या जातीच्या मोर्चामागील अस्वस्थता शेती संस्कृतीतील समस्यांमुळे उद्भवली. यापूर्वी जगभर निघालेले मोर्चे पाहता अत्यंत कमी कालावधीत ठराविक नेतृत्वाशिवायही लक्षावधी लोक एकत्र येतात, यामागची मानसिक अस्वस्थता नीट ओळखली पाहिजे. मराठा क्रांती मूक मोर्चाद्वारे अनेक मागण्या पुढे आल्या अस्ल्याचे सांगितले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)