शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मनिर्भर’ साठी खासगीकरणाचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने देशाला ‘आत्मनिर्भर बनो’ असा संदेश दिला आहे. पण, त्याकरिता देशतील सरकारी व सार्वजनिक उपक्रमांचे सरसकट खाजगीकरण करण्याचा सपाटा सुरु केला आहे. रेल्वे, टपाल खाते, भारतीय जीवन विमा, राष्ट्रीयकृत बँका, डिफेन्स, कोल, पेट्रोलीयम यासह शिक्षण व आरोग्य क्षेत्र उद्योगपतींना विकण्याचा घाट रचला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकाच्या निषेध : जिल्ह्याभरात कर्मचाऱ्यांचा संप, शासकीय कार्यालयासमोर केली निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाने देशाला ‘आत्मनिर्भर बनो’ असा संदेश दिला आहे. पण, त्याकरिता देशतील सरकारी व सार्वजनिक उपक्रमांचे सरसकट खाजगीकरण करण्याचा सपाटा सुरु केला आहे. रेल्वे, टपाल खाते, भारतीय जीवन विमा, राष्ट्रीयकृत बँका, डिफेन्स, कोल, पेट्रोलीयम यासह शिक्षण व आरोग्य क्षेत्र उद्योगपतींना विकण्याचा घाट रचला आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या या भूमिकेच्या विरोधात देशातील ११ कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला होता. या संपामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसह सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून शासनाचा निषेध केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांनी निदर्शने करुन शासनाचा निषेध नोंदविला.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जि.प.समोर आंदोलनदेशात सरकारने खासगीकरणाचा सपाटा सुरु केला असून नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदी बघता सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे संवैधानिक मूल्यांना हरताळ फासला जात आहे. संपूर्ण शिक्षण कॉपोर्रेट क्षेत्राकडे गहाण ठेवून सामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणातून हद्दपार करण्याची नीती दिसून येत आहे. अशा या अवसानघातकी धोरणास विरोधात देशभरातील कामगार संघटना, सरकारी व निम-सरकारी कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला.या संपात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनेही सहभाग नोंदवून जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व आयटकच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व विजय कोंबे, दिलिप उटाणे, सिद्धार्थ तेलतुंबडे, मनिष ठाकरे, मनोहर डाखोळे, प्रशांत निंभोरकर, सुधीर सगणे, यशवंत कुकडे, सुधीर ताटेवार, प्रदीप देशमुख, चंद्रशेखर ठाकरे, दीपक शेकार, श्रीकांत केंडे, अरूण वाके, भास्कर पोंगाडे, योगेश भडांगे, प्रदीप मसने यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक