शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

भाजीपाल्याचे दर कडाडले, लसूण १२० रुपयाला पावभर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:18 IST

महागाईचा भडका : गृहिणीचे बजेट कोलमडले, सर्वसामान्यांचे हाल

पुरुषोत्तम नागपुरे लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : सध्या भाजीपाला व धान्याचे भाव गगनाला भिडल्याने, मध्यम वर्ग व गरिबांना महागाईचा फटका बसत आहेत. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे. यावर्षी पावसामध्ये उघडझाप असल्यामुळे भाजीपाल्यांची आवक कमी होऊन भावात प्रचंड तेजी आली आहे. १२० रुपयाला लसूण पावभर मिळत आहे. अद्रक, कांदे, मिरची, टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी, फुलकोबी, कोथिंबीर यांचे भाव कडाडले असून इतर भाजीपालाही महाग झाला आहे.

जवळपास सर्वच भाजीपाल्यांचे भाव वाढत असताना टोमॅटोच्या भाववाढीमुळे महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत. रोजच्या आहारातील कांद्याचे भाव सुद्धा गगनाला भिडत असल्याने, कांदा उत्पादक शेतकरी आनंदी झाला असला तरी दलालांनी त्यालाही अंधारात ठेवून आपलं चांगभलं केले आहे. तद्वतच इंधनापासून गॅस सिलिंडरची किंमत सुद्धा वाढल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे. वातावरणातील नैसर्गिक चक्राच्या बदलामुळे भाजीपाल्याला मोठा फटका बसत असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सर्वत्र लहान मोठ्या शहरांमध्ये व विशेषतः ग्रामीण भागामध्ये भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

आता टोमॅटो ६० रुपये किलो, अद्रक २५० रुपये, मिरची २०० रुपये, कोथिंबीर ४०० रुपये, गवार १०० रु., कारले ८० रुपये, शेवग्याच्या शेंगा १०० रुपये, भेंडी ८० रुपये, असे भाव पाहायला मिळत आहेत. बहुधा येणारे एक-दोन महिने भावात घसरण होण्याची शक्यता दिसत नाही. मटण, मासे, डाळीचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वधारले आहेत. तूरडाळीचा भाव गगनाला भिडला असून तूरडाळ १६० रुपये दराने विकत घ्यावी लागत आहे. काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्यांचे दर इतके कोसळले होते की बाजारातून टोमॅटो फेकून देण्याची वेळ कास्तकार बंधूंवर आली होती. 

आता मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत असला तरीही बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट झालेली आढळून येत आहे. म्हणून भाववाढ होत असली तरीही बळीराजाच्या पदरी निराशाच दिसून येत आहे. त्यामुळे या भाववाढीवर नियंत्रण येणे गरजेचे आहे. साठेबाजी करणाऱ्या तथाकथित दलालांना वठणीवर आणणे गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धाInflationमहागाई