शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

४५०० वरच स्थिरावला कापसाचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:46 IST

यंदा विविध कारणांनी खरीपात शेतकºयांना कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. यातच आता अधिक मजुरी देत महिलांकडून कापसाची वेचणी करावी लागत आहे.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : ६ हजार दराची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा विविध कारणांनी खरीपात शेतकºयांना कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. यातच आता अधिक मजुरी देत महिलांकडून कापसाची वेचणी करावी लागत आहे. अशा स्थितीत कापसाला ६ हजार रुपये भाव मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकºयाला केवळ ४४०० ते ४५०० रुपये क्विंटल भाव खासगी व्यापारी देत आहे. यामुळे शासनाकडून कापूस उत्पादक शेतकºयांची मोठी कुचंबना करण्यात येत आहे.विदर्भात वर्धा जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतीचा कापूस पिकतो. यामुळे कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियासह राज्य व देशातील अनेक व्यापारी कापूस खरेदीसाठी वर्धा जिल्ह्यात येतात. यंदाही सरकारची खरेदी सुरू होण्यापूर्वी व्यापाºयांची कापूस खरेदी सुरू झाली आहे; पण व्यापाºयांकडून शेतकºयांना केवळ ४४०० ते ४५०० रुपये भाव दिला जात आहे. दररोज हा भाव बदलत असून कोणत्या दिवशी कोणता भाव राहिल, याची शाश्वती राहिलेली नाही. शासनाने केवळ नावापूरते कापूस खरेदी केंद्र सुरू केले. त्याकडे कुणीही शेतकरी येऊ नये, अशी व्यवस्थाच केली असल्याचे चित्र आहे. यावर्षी कापसावर अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला तसेच किटकनाशकाचा खर्चही वाढला. अत्यल्प पावसामुळे कापसाचे उत्पादन कमी येण्याची शक्यता असताना कापसाचा भाव मात्र स्थीरावलेला आहे. कापूस वेचणीचा खर्च दरवर्षीपेक्षा यंदा वाढल्याचे दिसून येत आहे. किमान एका महिला मजुरावर ७० रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत केवळ ४४०० रुपये भावावर शेतकºयाला कापूस पीक परवडणारे नाही, हे वास्तव आहे.इतर देशांत यावर्षी कापसाचे पाहिजे तेवढे उत्पादन झाले नाही. यामुळे भारतातील कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; पण भाव ४५०० वर स्थिरावले आहे. यामुळे शेतकºयांचा हिरमोड होत असल्याचे दिसून येत आहे.यंदा कापसाला प्रती क्विंटल ६००० रुपये भाव मिळायला हवा; पण सरकारकडून याबाबत काहीही उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे खासगी व्यापारी ४४०० रुपये दराने कापूस खरेदी करीत आहे. शासनाने क्विंटलमागे २५०० रुपये बोनस सरसकट कापूस उत्पादक शेतकºयांना द्यावा. पणन महासंघ, सीसीआय व खासगी व्यापारी यांना कापूस विकणाºया सर्व शेतकºयांचा या बोनसमध्ये समावेश करावा.- सुधाकर देवराव माहुरे, शेतकरी, मौजा जखाळा, घोराड.