शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

साथीच्या आजारांसाठी प्रतिबंधात्मक उपाय हाच पर्याय

By admin | Updated: July 11, 2016 02:02 IST

पावसाचा जोर वाढताच साथीचे आजारही वाढू लागले आहेत. मलेरिया, डेंग्यू, डायरिया, टायफाईड, कावीळ आदी आजारांनी डोके वर काढले आहे.

यशवंत महाविद्यालयात जनजागृती : वैद्यकीय जनजागृती मंचाच्या शाळा जागर मोहिमेस प्रारंभवर्धा : पावसाचा जोर वाढताच साथीचे आजारही वाढू लागले आहेत. मलेरिया, डेंग्यू, डायरिया, टायफाईड, कावीळ आदी आजारांनी डोके वर काढले आहे. सध्या सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली. साचलेल्या पाण्याचे डबके, घराच्या छतावरील अस्वच्छता कुलरच्या टाक्या कायम ठेवणे, पिण्याच्या व वापराच्या पाण्याच्या टाक्यांतील अस्वच्छता, भांडी कोरडी न करणे आदींमुळे साथीचे आजार पसरविणऱ्या डासांचा प्रादुर्भाव वाढला. हे आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाच मार्ग आहे, असे मत डॉ. सचिन पावडे यांनी व्यक्त केले.वैद्यकीय जनजागृती मंचातर्फे पावसाळ्यातील आजारांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रारंभ शनिवारी सेलू येथील यशवंत महाविद्यालयातून करण्यात आला. यावेळी पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबाबत सजगतेचा इशारा देत प्रतिबंधात्मक उपायही डॉ. पावडे यांनी सूचविले. याप्रसंगी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. धाकटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धमाने, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. प्रदीप सुने, डॉ. प्रशांत वाडिभस्मे, डॉ. आनंद गाढवकर, डॉ. राजेश सरोदे, डॉ. प्रवीण सातपुते उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना आरोग्य जपण्याचा मंत्र दिला. यावेळी प्राचार्य रंजना दाते उपस्थित होत्या.पावसाळ्यात पाणी खराब होणे, दूषित होणे, असे प्रकार घडतात. परिणामी, डायरिया, टायफाईड, कावीळ असे आजार संभवतात. पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केल्यास फारच उत्तम. त्यातही पिण्याचे पाणी वापरताना उकळून पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. वापराच्या पाण्याची टाकी स्वच्छ करून पांढरा चुना मारणे, त्यात गप्पी मासे पाळणे हे उपाय आहेत. हे मासे मच्छरादी फस्त करून पाणी स्वच्छ ठेवतात.विविध साथीच्या आजाराची उत्पत्ती ज्या डासांपासून होते, असे डास स्वच्छ पाणी व साचलेल्या पाण्यात वाढतात. छतावर टाकाऊ वस्तू जसे डब्बे, टायर, नारळाचे रिकामे डोल आदी पडून असल्यास तेथे डासांची उत्पत्ती होते. सोबतच अनेकांनी अद्याप कुलर काढून ठेवले नाही. कुलरच्या टाकीमध्ये हमखास डासांची उत्पत्ती होते. या डासांच्या दंशातून साथीच्या आजाराची लागण होते. परिसरातील पाणी साचलेले खड्डे धोकादायक ठरतात. या खड्ड्यांत थोडेसे क्रुड आॅईल, रॉकेल टाकल्यास डासांची उत्पत्ती रोखली जाऊ शकते. याबाबत नागरिकांनी सक्रीयता दाखविणे गरजेचे आहे. डासांमुळे डेग्यू, मलेरिया, तर दूषित, खराब पाण्यामुळे डायरिया, टायफाईड, कावीळ असे आजार उद्भवतात. यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, असेही सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)