शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कृपलानीच्या अतिक्रमणाबाबत केसरीमलवर दबाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:37 IST

वर्धा-नागपूर मार्गावर शिवाजी चौक ते इंदिरा गांधी चौक दरम्यान केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूंचे बेकायदेशीर हॉटेल बांधकाम सुरू आहे. या हॉटेलच्या बांधकामामुळे केसरीमल कन्या शाळेतील १२५० विद्यार्थिनीच्या भवितव्याला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देन.प.कडे तक्रार करणार : विद्यार्थ्यांच्या भवितव्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-नागपूर मार्गावर शिवाजी चौक ते इंदिरा गांधी चौक दरम्यान केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूंचे बेकायदेशीर हॉटेल बांधकाम सुरू आहे. या हॉटेलच्या बांधकामामुळे केसरीमल कन्या शाळेतील १२५० विद्यार्थिनीच्या भवितव्याला धोका निर्माण झाला आहे.केसरीमल कन्या शाळेच्या व्यवस्थापनाने या विरोधात तत्काळ नगर पालिकेकडे सदर अतिक्रमण पाडण्याबाबत तक्रार नोंदवावी अशी मागणी शिवा संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. केसरीमल कन्या शाळा सोमवारी या प्रकरणी नगर पालिकेकडे तक्रार दाखल करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. केसरीमल कन्या शाळेत १ हजार २५० मुले, मुली शिक्षण घेत आहेत. सदर शाळेचे तीनही प्रवेशद्वार हे समोरील अति रहदारीच्या वर्धा नागपूर महामार्गावर आहेत. याच महामार्गाला लागून कृपलानी बंधुचे बेकायदेशीर व अनधिकृत हॉटेल बांधकाम सुरू आहे. या मार्गावर शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनीची ने आण करणारे आॅटो, स्कूल बसेस यांची मोठी वर्दळ दिवसभर राहते. अशा ठिकाणी हॉटेलचे बांधकाम करण्यात येत आहे. याठिकाणी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे सरकारी जागेवरच वाहने उभी केली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली असून सार्वजनिक हित लक्षात घेवून या हॉटेलचे बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे अशी मागणी शिवा संघटनेचे वर्धा जिल्हा प्रमुख सुरेश पट्टेवार यांनी केली आहे. आता केसरीमल कन्या शाळा व्यवस्थापन समिती व येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या पालकांनी केसरीमल कन्या शाळेवर दबाव वाढविला असून शाळा व्यवस्थापनाने तत्काळ अवैध बांधकामाविरोधात तक्रार नगर पालिकेकडे नोंदवावी व हे बांधकाम थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे. सुरेश पट्टेवार यांनी ७ डिसेंबरला केसरीमल कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका व शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. यात हे अतिक्रमण पाडण्यासाठी तक्रार न केल्यास पुढे होणाºया अपघातांना शाळा व्यवस्थापन जबाबदार राहिल. असे या निवेदनात नमूद केले आहे.अ‍ॅड. गुरू यांनी बजावली महावितरणला नोटीसआम रहदारीच्या मुख्य मार्गावर महावितरण कंपनीने बेकायदेशीर बांधकाम होत असलेल्या कृपलानी बंधूंच्या हॉटेलला वीज पुरवठा करण्यासाठी मोठे विद्युत रोहित्र दिले आहे. हे विद्युत रोहित्र सरकारी जागेवर उभे करण्यात आले आहे. तसेच जमिनीतून वायर टाकून हा पुरवठा करण्यात आला आहे. उद्या अपघात झाल्यास. या परिसरातील शेकडो घरांना नुकसान होणार आहे. त्यामुळे येथील विद्युत पुरवठा तत्काळ बंद करावा अशी मागणी अ‍ॅड. रवींद्र गुरू यांनी लेखी नोटीसद्वारे केली आहे. महावितरणने बेकायदेशीररित्या दिलेल्या या विद्युत पुरवठ्यामुळेही महावितरणसह कृपलानी बंधुची अडचण वाढणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाEnchroachmentअतिक्रमण