शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:06 IST

सर्व सेवा संघाने अधिसूचना काढून आश्रमाचे मंत्री मुकुंद मस्के यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभार सोपवून त्यांना सहकार्य करण्यासाठी मार्गदर्शक समिती गठित केली आहे. त्यामुळे आता आश्रमातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देनवीन मार्गदर्शक समितीचे गठनअंतर्गत कलह चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जगाला सत्य, अहिंसा, प्रेमाचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात सध्या आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाचा वाद सुटताना दिसत नाही. आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू यांना सर्व सेवा संघाने पदमुक्त केले तरी ते आजही सक्रिय आहेत. सर्व सेवा संघाने अधिसूचना काढून आश्रमाचे मंत्री मुकुंद मस्के यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभार सोपवून त्यांना सहकार्य करण्यासाठी मार्गदर्शक समिती गठित केली आहे. त्यामुळे आता आश्रमातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आस्था असलेले टी.आर.एन.प्रभू यांनी २०१८ मध्ये आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. पण, दोन वर्षांनंतर त्यांच्या पदाबद्दल कुरबूर सुरू झाल्याने सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी अनुशासनहिनता आणि आश्रमाच्या मर्यादेचा भंग केल्याचा ठपका ठेवत १८ मार्च २०२० रोजी प्रभू यांना अध्यक्षपदावरून पायउतार केले. त्यानंतर लगेचच प्रभू यांनी हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगून आपणच राजीनामा देत असल्याचे त्यांनी एका पत्रातून आश्रम संचालकांसह गांधीवाद्यांना कळविले.

जानेवारी २०२० मध्ये मुंबईत सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात प्रभू यांना राजीनामा देण्यासाठी सांगितले होते. तसेच नवीन अध्यक्ष होईपर्यंत मंत्री असलेले मुकुंद मस्के यांच्याकडे पदभार सोपविला होता. लॉकडाऊनमुळे सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची जूनमध्ये आॅनलाईन बैठक झाली. यात आश्रमाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भवानी शंकर कुसुम यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती गठित करून समाधान शोधून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविली होती.

समितीने जून महिन्यात अहवाल सादर केला. २९ जूनच्या बैठकीत अहवालावर विचार विनिमय करून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या कामकाजासाठी मार्गदर्शक समिती गठित करण्यात आली. यामध्ये माजी अध्यक्ष अ‍ॅड. मा. म. गडकरी, छत्तीसगड सर्वोदय मंडळाचे अध्यक सियाराम साहू आणि वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष मोहन खैरकार यांचा समावेश आहे. नवीन अध्यक्ष नियुक्तीपर्यंत प्रभारी अध्यक्ष म्हणून मंत्री मुकुंद मस्के समितीच्या मार्गदर्शनात कार्य करतील, असे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आश्रमातील अध्यक्षपदाचा वाद केव्हा निवळेल, हे सांगता येणार नाही.आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यांना सहकार्य करण्याकरिता तीन सदस्यांची मार्गदर्शन समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या मार्गदर्शनात मस्के हे कार्य करतील.- महादेव विद्रोही, अध्यक्ष,सर्व सेवा संघ.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम