शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

५५ कोटी ४६ लक्ष खर्चाचा अर्थसंकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:22 IST

स्थानिक नगर पालिकेचा ५५ कोटी ४६ लक्ष खर्चाचा व वर्षाअखेर ७ कोटी ८५ लक्ष शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुचिता मडावी होत्या.

ठळक मुद्देदेवळीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक नगर पालिकेचा ५५ कोटी ४६ लक्ष खर्चाचा व वर्षाअखेर ७ कोटी ८५ लक्ष शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुचिता मडावी होत्या.स्थानिक न.प. च्या विशेष सभेत नगराध्यक्ष मडावी यांनी २०१९-२० या चालू वर्षाच्या अपेक्षीत खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेता शोभा तडस, न.प. सदस्य मारोती मरघाडे, नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, संगीता तराळे, कल्पना ढोक, संध्या कारोटकर, सुनिता बकाणे, सुनिता ताडाम, सारीका लाकडे, अ. नईम आदींनी चर्चेत सहभाग घेवून व काही दुरूस्त्या सूचवून सभागृहात मांडलेला अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर केला. न.प.ची विकासकामांची वाटचाल सुरू असून शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच सौंदर्यीकरणाचे कामावर भर देण्यात आल्याचे यावेळी नगराध्यक्ष मडावी यांनी सांगितले.अर्थसंकल्पातील अपेक्षीत खर्चात वैशिष्टपूर्ण कामे अंतर्गत स्टेडियमचे उर्वरीत बांधकाम २ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण कामात अंतर्गत नाली व रस्ते बांधकाम ६ कोटी, विशेष अनुदानाअंतर्गत इतर विकास कामे १२ कोटी, नागरी दलीत वस्ती सुधारणा १ कोटी, रस्ते अनुदानात १ कोटी, युडी ६ अंतर्गत शॉपींग सेंटर बांधकाम ५० लक्ष, माध्यमिक शाळा विस्तारीत बांधकाम १० लक्ष, हरित पट्टे विकास ५० लक्ष, खासदार निधी ३० लक्ष, आमदार निधी ५ लक्ष, अल्पसंख्याक अनुदानाअंतर्गत कामे १५ लक्ष, अग्नि सुरक्षा योजना १० लक्ष, सांडपाण्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावणे २५ लक्ष, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीत वस्ती सुधारणा १ कोटी, एकलव्य आदिवासी घरकुल योजना ५० लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली. रमाई घरकुल योजना ३ कोटी २५ लक्ष, पंतप्रधान आवास योजना १७ कोटी, नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता विकास कामे १० लक्ष, अपंग कल्याण ५ लक्ष, न.प. प्राथमीक सोयी सुविधा अनुदान १५ लक्ष, १४ व्या वित्त आयोगातून खर्च १ कोटी, सीटी सर्व्हेक्षण २ लक्ष, नगरोत्थान अभियान अंतर्गत कामे २० लक्ष तसेच इतर विकास कामांचा समावेश करण्यात आला.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प