शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

कापड गिरणीच्या आवारात ती बग्गी आहे ‘हेरिटेज’ म्हणून उभी

By admin | Updated: September 25, 2015 02:46 IST

ब्रिटीश राजवटीत राणी व्हिक्टोरिया मोठे घोडे जुंपलेल्या उंच चाकाच्या घोडागाडीतून बाहेर फिरायला जात होत्या.

‘व्हिक्टोरिया’ घोडागाडी देतेय स्मृतींना उजाळाहेमंत चंदनखेडे  हिंगणघाट ब्रिटीश राजवटीत राणी व्हिक्टोरिया मोठे घोडे जुंपलेल्या उंच चाकाच्या घोडागाडीतून बाहेर फिरायला जात होत्या. महाराणी व्हिक्टोरिया ऐश्वर्याची प्रतिक ठरल्याने या गाडीलाही ‘व्हिक्टोरिया’ असे नाव मिळाले. तशीच घोडागाडी हिंगणघाट येथील कापड गिरणीचे मालक सेठ मयुरादास मोहता यांनीही शहरात फिरण्याकरिता त्या काळात आणली होती. ऐश्वर्याचे प्रतिक असलेली व्हिक्टोरिया बग्गी आता इतिहासजमा झाली असली तरी त्याचे नातू व गिमाटेक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन वसंतकुमार मोहता यांनी आजोबांची आठवण म्हणून ही बग्गी संग्रही ठेवली. कापड गिरणीच्या आवारात ‘हेरिटेज’ म्हणून जतन केलेली ही बग्गी मोहता परिवाराच्या वैभवाच्या आठवणींना उजाळा देत आहे. दोन किमी अंतरावर असलेल्या नागपूर मार्गावरील वृंदावन बागेची पाहणी करून बरोबर ६ वाजता बंगल्याच्या दारात ते व्हिक्टोरियानेच परत येत होते. त्यांचा हा दिनक्रम ठरलेला असायचा. बग्गीचा सारथी व मतदगार लालफेटे व परिटघडीचा पांढराशुभ्र गणवेश परिधान केलेला असायचा. बग्गीच्या घोड्यांचा अस्सल चांदीचा मुलामा असलेला सुमारे ५० किलो वजनाचा साज आता बंदिस्त पेटीत आहे. हा साज सेठ मयुरादास यांनी राजस्थानी कारागिरांकडून घडवून घेतला होता. आधुनिकता व मोटर सायकलच्या युगात आलिशान बग्गी इतिहासजमा झाली आहे. मुंबईची व्हिक्टोरियादेखील अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. अनेक पुरातन वस्तुप्रमाणेच व्हिक्टोरियाही संग्रहातील मौल्यवान स्मृती झाली आहे. घोड्यांचा साज होता चांदीचा मुलामा केलेला बग्गीच्या घोड्यांचा साज अस्सल चांदीचा मुलामा देऊन बनविलेला होता. त्याचे वजन सुमारे ५० किलो होते. आता हा साज बंदिस्त पेटीत ठेवण्यात आला आहे. हा साज सेठ मयुरादास यांनी खास राजस्थानी कारागिरांकडून घडवून घेतला होता, अशी माहिती आहे. आधुनिकता व मोटर सायकलच्या युगात आलिशान बग्गी इतिहासजमा झाली असली तरी त्याला मिळालेली प्रतिष्ठा आजही वैभवशाली इतिहासाची साक्ष देते. याचे जतन केल्याने त्याला महत्त्व प्राप्त होत आहे.या बग्गीचे जतन करताना त्याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून येते.