गावकऱ्यांची महावितरणच्या कार्यालयावर धडक : बोपापूरचा पाणीपुरवठाही ठप्पदेवळी : नजीकच्या बोपापूर (दिघी ) शेतशिवारातील थ्रीफेजचा विजपुरवठा गत महिन्यापासून बंद आहे. यामुळे नागरिांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गावातील सिंगल फेजचा पुरवठाही गत चार दिवसांपासून बंद असल्यामुळे गावातील पाणी-पुरवठा ठप्प झाला आहे. शिवाय गावात काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. वारंवार सूचना देवूनसुद्धा महावितरणच्यावतीने दखल घेतली जात नाही. यामुळे गावकऱ्यांनी देवळीच्या महावितरणच्या कार्यालयात धडक देवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.महिनाभरापासून बोपापूर शिवारातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे रात्री-बेरात्री जागुन सुद्धा ओलिताची कामे पूर्ण होत नसल्याने शेतकररी अडचणीत आला आाहे. सध्या पाऊस आल्याने ओलिताची चिंता नाही. मात्र मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले होते. विद्युत कार्यालयामध्ये वारंवार तोंडी व लेखी तक्रारी देवून सुद्धा कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे नागरिकांनी थेट कार्यालयात धडक देत आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमक्ष मांडल्या.(प्रतिनिधी) न.प. ले-आऊटमधील पथदिवे बंदस्थानिक न.प.ले-आऊट व भोंग ले-आऊट मधील स्ट्रीट लाईट गत काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे काळोखाचा फायदा घेऊन या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गत १५ दिवसांत या ले-आऊटमधील मिलींद भागवत, अशोक देशमुख व मेहेरबाबा केंद्रात चोऱ्या झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत चार महिन्यांत या परिसरातील स्ट्रीट लाईटचा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. याबाबत न.प. प्रशासन व विद्युत कार्यालयात सुद्धा दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांत रोष आहे.नागरिकांची पाण्याकरिता भटकंतीविद्युत पुरवठा खंडित असल्याने पाणी पुरवठाही ठप्प झाला आहे. गत चार दिवसांपासून नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यात पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. या परिसरासाठी पूर्णवेळ लाईनमन देवून तसेच परिसरात असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून समस्येचे निवारण व्हावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विद्युत पुरवठा महिनाभरापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2015 01:51 IST