शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वीज खांब झुकले, तारा तुटलेल्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:06 IST

शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना येत आहे. पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी सिंचन करून पिके वाचवू शकले असते; पण वादळी पावसात वाकलेले खांब व तुटलेल्या तारांची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही.

ठळक मुद्देसोनेगाव (बाई) येथील प्रकार : महावितरणचे दुर्लक्ष, बीजांकूर कोमेजले

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना येत आहे. पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी सिंचन करून पिके वाचवू शकले असते; पण वादळी पावसात वाकलेले खांब व तुटलेल्या तारांची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे आठ दिवसांपासून सिंचन ठप्प आहे. परिणामी, जमिनीतील बिजांकूरही कोमेजले आहे.यंदा मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत पाच-सहा दिवस दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. विशेषत: ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. सोनेगाव (बाई) येथील सिंचनाची सोय असलेल्या असंख्य शेतकºयांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी सिंचनाच्या तयारीत आहे; पण पहिल्या पावसात वादळाने वाकलेले वीज खांब व तुटलेल्या तारा महावितरणने अद्याप दुरूस्त केल्या नाहीत. यामुळे सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. वारंवार महावितरण कार्यालयात सूचना व तक्रार करूनही दुरूस्ती करण्यात आली नाही. महावितरणच्यास या कोटगेपणामुळे सिंचन व्यवस्था असताना शेतकऱ्यांना लाखमोलाची पिके वाचविता येत नाही. डोळ्यादेखत बिजांकूर कोमेजताना पाहून शेतकऱ्यांचे काळीज धडधडत आहे.आठ दिवसांपासून महावितरणने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने शेत शिवारात विद्युत खांब झुकलेले तथा ठिकठिकाणी तारा तुटल्याचे दिसून येत आहे. या तारा व वाकलेल्या खांबांमुळे शेतीची कामेही खोळंबली आहेत. कृषी पंप बंद असल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. महावितरणने याकडे लक्ष देत त्वरित लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.दुरूस्तीचा दिवस उजाडेच नाजिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे दमदार हजेरी लावली. यातच वादळी वाऱ्यामुळे देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विद्युत खांब झुकले. शिवाय तारा तुटल्याने शेतशिवारांतील विद्युत प्रवाह खंडित झाला. सोनेगाव बाई येथील शेतांतील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा आठ दिवसांपासून बंद आहे. अनेक ठिकाणी वीज खांब झुकले असून तारा तुटलेल्या आहेत. शेतांमध्ये खांब व तारा असल्याने शेतीची कामे करणेही कठीण झाले आहे. याबाबत तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याने असंतोष पसरला आहे. वायगांव येथील विद्युत कार्यालयात तक्रार करायला गेल्यावर उद्या दुरूस्ती करून देतो, असे सांगितले जाते; पण सहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा दुरूस्तीचा दिवसच उजाडला नाही. यामुळे शेतकरी मात्र त्रस्त आहे.

टॅग्स :electricityवीजDeoliदेवळी