लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : येथील डाक कार्यालयातील इंटरनेट सेवा कोलमडल्याने पंधरड्यापासून सेवा ठप्प झाली आहे. परिणामी, नागरिकांना आल्यापावलीच परतावे लागत आहे. .अल्लीपूरसह लगतच्या गावांतील ज्येष्ठ नागरिकांची खाती याच डाक कार्यालयात आहेत. ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी गेले असता लिंक फेलचा फलक मागील पंधरा दिवसांपासून झळकत आहे. त्यामुळे वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे.गावात भारत संचार निगम लिमिटेडच्या सेवेत सातत्याने तांत्रिक बिघाड निर्माण होतो. याचा परिणाम, विविध कार्यालयातील इंटरनेट सेवा नेहमीच प्रभावित होते. सुकन्या योजनेचे पैसे डाक कार्यालयात भरावे लागतात. नागरिक पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी याशिवाय किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी जातात. विविध प्रकारच्या कामासाठी कार्यालयात येणाऱ्या हजारो ग्राहकांना लिंक फेलमुळे आल्यापावली परतावे लागत आहे. वरिष्ठांनी उपाययोजना करून डाक कार्यालयातील कारभार सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.भारत संचार निगम लिमिटेची इंटरनेट सेवा बंद असल्याने डाक कार्यालयाच्या सेवेवर परिणाम झाला आहे. यामुळे ग्राहकांना त्रास होत आहे.- सुनील लोखंडे, पोस्ट मास्टर, अल्लीपूर.
डाक कार्यालयातील सेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST
अल्लीपूरसह लगतच्या गावांतील ज्येष्ठ नागरिकांची खाती याच डाक कार्यालयात आहेत. ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी गेले असता लिंक फेलचा फलक मागील पंधरा दिवसांपासून झळकत आहे. त्यामुळे वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे.
डाक कार्यालयातील सेवा कोलमडली
ठळक मुद्देपंधरवड्यापासून ‘नो कनेक्टिव्हिटी ’: नागरिकांच्या कामांचा खोळंबा