शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

सायबर हल्ल्याची शक्यता; पोलिसांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:57 IST

सध्याच्या सर्वच व्यवहार आॅनलाईन झाले. संगणकाशी निगडीत असलेले इंटरनेत खिशात पोहोचले आहे. ते जेवढे सुविधेचे आहे तेवढेच आता धोक्यात होत असल्याचे समोर येत आहे

ठळक मुद्देदक्ष राहण्याच्या वरिष्ठांच्या सूचना : वायफाय राऊटर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, स्टोरेज बॉक्स आदींना हानीची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या सर्वच व्यवहार आॅनलाईन झाले. संगणकाशी निगडीत असलेले इंटरनेत खिशात पोहोचले आहे. ते जेवढे सुविधेचे आहे तेवढेच आता धोक्यात होत असल्याचे समोर येत आहे. जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांच्या उपकरणांवर रिपर किंवा लो टुप या बॉटनेटचा वापर करून सायबर हल्ल्याची शक्यता वर्तविली असल्याने वायफाय राऊटर्स, सीसीटीव्ही कॅमेरे आदीं उपकरणांना धोका होऊ शकतो. हा सायबर हल्ला टाळण्यासाठी दक्ष राहून योग्य उपाययोजना आखण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती आहे.कठीण पासवर्ड प्रभावी उपायसदर हल्ल्यापासून वाचण्यासाठी इंटरनेट वापरणाºयांनी आपल्या इंटरनेट आधारित उपकरणांचे पासवर्ड बदलविणे गरजेचे आहे. पासवर्ड नवीन तयार करताना तो अधिक कठीण स्वरुपाचा ठेवल्यास हॅकरला तो सहज हॅक करता येत नाही.नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचेजगभरातील सायबर तज्ज्ञांनी रिपर नावाचा बॉटनेटचा वापर करून सायबर हल्ला होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे सदर सायबर हल्ल्यापासून बचावासाठी नागरिकांनी दक्ष राहून छोट्या-छोट्या गोष्टी करणे गरजेचे आहे. नागरिकांनी दक्ष राहून आवश्यक उपाय योजना केल्यास कुठलेही नुकसान होत नाही, असे कळविण्यात आले आहे.मिराई व्हायरसपेक्षा रिपर मोठासदर वायरस बॉटनेटचा वापर करून इंटरनेट आधारित उपकरणांवर ताबा मिळविणाºया व वापरकर्त्यांची माहिती चोरी करणाºया मिराई व्हायरस पेक्षाही मोठा हल्ला रिपर द्वारे होण्याची भीती तज्ज्ञांकडून वर्तविली गेली आहे. सावधगिरीच यावर प्रतिबंधात्मक मोठी उपाययोजना असल्याचे सांगण्यात येते.काय आहे बॉटनेट?बॉटनेट हा शब्द रोबोट व नेटवर्कचा एक संयोजन आहे. वास्तविक स्वरूपात हे इंटरनेट कनेक्टेड डिव्हाइसेस, जसे की पीसी, सर्व्हर्स, मोबाईल डिव्हाइसेस व इंटरनेटवरील वस्तूंचे संकलन आहे. हल्लेखोरांच्या गटाद्वारे दूरस्थपणे संक्रमित होतात त्याला बॉटनेट असे संबोधीले जाते. बोटेनेटचा हेतू ईमेल स्पॅम आणि डीडीओचे आक्रमण करणे असा आहे.बायनेट कसे कार्य करते?हॅकर्स हे मालवेअरच्या सहाय्याने एखाद्या उपकरणांवर नियंत्रण मिळवितात. तसेच त्याद्वारे हे इंटरनेटद्वारे जोडलेल्या इतर उपकरणांमध्ये शिरतात. त्यानंतर ते व्हायरस असलेले कोड इतर संगणक अथवा उपकरणावर पाठवितात. त्यानंतर त्या उपकरणावर संपूर्ण ताबा मिळवून त्यातून त्यांना हवी असलेली वापरकर्त्यांची माहिती चोरतात. इतकेच नव्हे तर त्याआधारे हानी पोहचवू शकतात.रिपर बॉटनेट म्हणजे काय?रिपर हा बॉटनेट आधुनिक तंत्र वापरून कमजोर पासवर्ड असलेल्या वायरलेस आयपी कॅमेरा, राऊटर्स आदी सारख्या उपकरणांमध्ये शिरतो. त्यातून हॅकर्स हे इंटरनेटआधारित इतर उपकरणांची सुरक्षा तोडण्यासाठी या रिपरचा उपयोग करतात. त्यामुळे या सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिकांनी आपल्या सीसीटीव्ही कॅमेरे, राऊटर्स आदी इंटरनेटशी जोडलेल्या उपकरणांचे पासवर्ड बदलून काळजी घेणे गरजेचे आहे.बचावासाठी सूचविलेले उपायइंटरनेट आधारित सर्व उपकरणांचे पासवर्ड बदलावे.पासवर्ड बदलतांना त्यात एक अंक, चिन्हे, इंग्रजीचे मोठ्या अक्षर वापरावे.उपकरणाचे फर्मवेअर अपडेट केले नाही, त्यांनी ते त्वरित करून घ्यावे.नेटवर्कसाठी मजबूत एन्क्रिप्शन सिफरसारख्या सर्वोत्तम पद्धतींचा वापर करावा. वापरात नसलेल्या सेवा बंद करून नॉन-क्रिटिकल नेटवर्क एक्सप्लोरर कमी करावे.डिव्हाइसमध्ये संशयास्पद काही दिसून आल्यास फॅक्टरी रिसेटद्वारे मालवेयर हे घालवू शकतो. त्यामुळे फॅक्टरी रिसेट करावे.हल्ल्यामुळे उद्भवणार या समस्याबॉटनेटच्या या हल्ल्यात इंटरनेटवर आधारित वायफाय राऊटर्स, इंटरनेटवर जोडलेले सीसीटीव्ही कॅमेरे, स्टोरेज बॉक्स आदींना हानी पोहचू शकते. त्यातून हॅकर्स वापरकर्त्यांची माहिती चोरून त्याचा गैरवापर करू शकतात. यामुळे नागरिकांनी वेळीच सतर्क राहण्याच्या सूचना आहेत.ब्ल्यूवेल गेम संदर्भात त्यावेळी मार्गदर्शनात्मक सूचना आल्या होत्या. तशाच सूचना पुन्हा आल्या आहेत. सायबर क्राईम संदर्भात वरिष्ठांकडून वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना येत असतात. काही सूचना नव्याने आल्या आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याचे अनेकवार सांगण्यात येते. मात्र सायबर हल्ला टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.- निर्मलादेवी एस., पोलीस अधीक्षक वर्धा.