वर्धा : विद्यार्थ्यांनी यश मिळविण्यासाठी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. तसेच कोणतेही काम मन लावून व स्वत:ला पूर्ण झोकून देऊन सातत्याने अभ्यास करणे आवश्यक आहे. आत्मविश्वास वाढविण्यासाठी सतत वाचन, संपर्क, निरीक्षण करीत राहावे व प्रश्न विचारण्याची सवय ठेवावी असे प्रतिपादन वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी केले.निर्माण फाऊंडेशन व मगन संग्रहालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वा जनजागृती रॅली काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी अतुल शर्मा, सुषमा शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी व अमीर अजानी आदी उपस्थित होते. येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट, शहीद अब्दुल हमीद उर्दू हायस्कूल, सुफा प्रायमरी स्कूल सावंगी (मेघे) या शाळा मधील विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. मुस्लीम विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या बाबींची माहिती व्हावी. वर्धा येथे चालत असलेले विविध सामाजिक उपक्रम माहिती व्हावे व विज्ञानाची आवड त्यांच्यात निर्माण व्हावी या हेतूने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमीर अजानी यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मगन संग्रहालयाबद्दल माहिती देण्यात आली. चौधरी यांच्या हस्ते रुबैया कुरेशी, जबीन तुरक, प्रीती मदार, नजराना कुरेशी, अमरीन शेख, मुझफ्फर अली या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. नुबा तफीन, माहिम जावेद, रिया आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन किशोर जगताप यांनी केले. यशस्वीतेकरिता होली क्रॉस कॉन्व्हेंटचे अध्यक्ष मुस्ताक, पाशा, जहारुद्दीन, एजाझ हुसैन, जफरुल रहेमान, इम्रान खान, साजिद खान, शगुप्ता अफरोज अस्मीत प्रताप, महम्मद आरिफ, शेख सलीम, नसीम करिमी, प्रा. धनंजय सोनटक्के, मनीषा पेंटे, आरती घुसे आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
यशासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची गरज
By admin | Updated: September 15, 2014 00:19 IST