शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

राजकारण्यांनी संवेदनशील असणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:44 IST

सर्वच व्यक्तीत चांगला माणूस दडला असतो. त्याच्यातील चांगुलपणा समोर येऊन समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संवेदनशील असणे गरजेचे आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते असावे.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : आर्वीत कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सर्वच व्यक्तीत चांगला माणूस दडला असतो. त्याच्यातील चांगुलपणा समोर येऊन समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संवेदनशील असणे गरजेचे आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. त्यानंतर सर्वांनी विकासासाठी एकत्र येत आपला सहभाग द्यावा, त्यासाठी राजकारण्यांनी संवेदनशीलता बाळगणे गरजेचे आहे. संवेदनशीलता बाळगणारे राजकारणी आमचेही सहकारी मित्र राहणार, असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले.स्थानिक जागृती क्रीडा मंडळाद्वारे आमदार डॉ. शरदराव काळे स्मृती कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला कॉँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस, विदर्भ कबड्डी स्पर्धेचे सचिव जितेंद्र ठाकूर, जि.प. च्या माजी अध्यक्ष कलावती वाकोडकर, स्वप्ना शेंडे, हरीश इथापे, राजू साळवे, माजी जि.प. सदस्य गजानन गावंडेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आयोजक आमदार अमर काळे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विशद करीत मागील १८ वर्षांपासून आर्वीत स्पर्धा आयोजन करीत आहे, असे सांगत यातून खेळाडूंना प्रोत्साहन व नव्या पिढीत खेळ भावना रुजत असल्याचे सांगितले. मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने आर्वी विधानसभा क्षेत्रातील धामनदीचे खोलीकरण करण्यास सहकार्य करावे, त्यासाठी आमची सहकार्याची भूमिका राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अ‍ॅड. चारुलता टोकस, हरीश इथापे यांनीही विचार व्यक्त केले. आयोजकांच्या वतीने मकरंद अनासपुरे यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.अनासपुरे म्हणाले, सोशल मीडिया दुधारी तलवार आहे. युवकांनी याचा वापर विधायक कार्यासाठी करावा व आपल्या जगण्याचे ध्येय काय आहे, आपण आपल्या घरासाठी, समाजासाठी, देशासाठी जगतो का, या वास्तवात युवकांनी जगणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी व्हावा, असे सांगत पुढील काळात राजकारण्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे. अन्यथा पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही, कोणतेही काम मोठे नाही, परंतु काम मोठं झालं की, श्रेयवाद सुरू होतो. नाम फाऊंडेशन ही माणुसकीची, शेतकऱ्यांसाठीची चळवळ आहे. आपली संस्कृती शेतीपूरक असतानाही शेतकरी व्यावसायिक का होत नाही? अशी खंतही त्यांनी व्यक्त करीत नाम फाऊंडेशन पुढील काळात आंजी- येळाकेळी या ९ कि.मी. नदीचे खोलीकरण करणार असल्याचे सांगितले. यावेळी जागृती क्रीडा मंडळाचे खेळाडू अमोल जाधव, हिमांशू पाटील, रितेश डवरे, शुभम पोकळे, श्वेता रत्नपारखी, प्राची प्रधान व इतर खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार हस्ते करण्यात आला. संचालन अविनाश गोहाड यांनी केले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी ६ ला रात्री ८ वाजता सिने अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत.पीडित शेतकºयाला ‘नाम’चा मदतीचा हातघोराड- सेलू येथे १ महिन्यापूर्वी अनिल शिंदे नामक शेतकऱ्याचा १ बैल मरण पावला होता. याविषयीची माहिती आधार संघटनेचे सेलू तालुकाध्यक्ष शुभम झाडे यांना मिळाली असता त्यांनी ही माहिती नाम फाऊंडेशनचे विदर्भ-खानदेश प्रमुख हरीश इथापे यांना दिली. दरम्यान, इथापे यांनी नामच्या वतीने १५ हजार रुपयांची मदत अनिल शिंदे यांना जाहीर केली. नाम फाऊंडेशनच्या वतीने सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, आधार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जतिन रणनवरे, जिल्हाध्यक्ष विक्रम खडसे, विदर्भ उपाध्यक्ष पंकज ओरके, पृथ्वीराज शिंदे, संघटक प्रशांत झाडे, तालुका उपाध्यक्ष फैजानअली सय्यद यांच्या उपस्थितीती पीडित शेतकºयाला मदतीचा धनादेश देण्यात आला.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरेKabaddiकबड्डी