शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

देशभक्तीच्या भावनेने कर्तव्य बजावणारे पोलीस महान

By admin | Updated: October 23, 2016 02:25 IST

जीवाची पर्वा न करता देशभक्तीच्या भावनेने कर्तव्य बजावणारे पोलीस महानच आहे. आपले कर्तव्य पार पाडताना देशवासियांना सुरक्षित आयुष्य जगता यावे,

ध्यानी : शहीद नितीन पुट्टेवार स्मृतीदिन कार्यक्रमहिंगणघाट : जीवाची पर्वा न करता देशभक्तीच्या भावनेने कर्तव्य बजावणारे पोलीस महानच आहे. आपले कर्तव्य पार पाडताना देशवासियांना सुरक्षित आयुष्य जगता यावे, यासाठीच प्राण वेचले, हे लक्षात घेता त्यांना आदरांजली वाहणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे मत केंद्रीय राखीव दल पोलीस नागपूर विभागाचे समादेशक ध्यानी यांनी व्यक्त केले. भारत माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात शहीद नितीन पुट्टेवार पोलीस स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मंचावर प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन संस्थेचे सचिव धारकर, पोलीस निरीक्षक साळवी, नगरसेविका शारदा पटेल, मुख्याध्यापिका मोरे, उपमुख्या. बुरिले, पर्यवेक्षिका घोडवैद्य आदी उपस्थित होते. पोलीस दिवसाची माहिती देताना ध्यानी पूढे म्हणाले की, १९५० ला जम्मु-काश्मिरमधील लद्दाख येथे चीन या देशाला लागून असलेल्या सिमेची सुरक्षा करताना १० पोलीस शिपाई यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हापासून २१ आॅक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी शहीद नितीन पुट्टेवार यांच्या मातोश्री प्रतीभा पुट्टेवार यांचा ध्यानी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रतीभा पुट्टेवार यांनी या विद्यालयातून असे शुरवीर तयार व्हावे, अशी मनोकामना व्यक्त केली. धारकर यांनी आपले शिपाई सदैव जागृत राहतात, म्हणून आपण सुरक्षित आहोत. आपणही आपल्या मातृभूमीबाबत विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांना देशभक्ती, राष्ट्रप्रेम जागृतीसाठी प्रेरणा दिली पाहिजे, असे सांगितले. मुख्या. मोरे यांनी प्रास्तविक केले. शहीद नितीन पुट्टेवार यांच्याबबात माहिती देताना तो भारत विद्यालयाचा विद्यार्थी होता, ही अभिमानास्पद बाब आहे, असे सांगितले. साळवी, नगरसेविका पटेल यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन धात्रक यांनी केले तर आभार बुरीले यांनी मानले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)