लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्याविरूद्ध रामनगर पोलीस ठाण्यात एपीआय यादव यांनी योगेश हिवंज याच्या तक्रारीवरून तक्रारकर्त्यांवर दबाव तंत्राचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केले. या प्रकरणी चौकशी करून एपीआय सचिन यादव यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी रामनगर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात येणार होता; पण आंदोलनच्या एक दिवसापूर्वी आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्यांना रामनगर पोलिसांनी १४९ अन्वये नोटीस बजावून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आला आहे.आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असताना संतप्त नागरिकांनी यादव यांच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी १० वाजतापासून स्थानिक पावडे नर्सिंग होम चौकात एकत्र होण्यास सुरूवात केली होती. मोर्चा काढल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कारण पुढे करीत केवळ आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात जावून आपल्या मागण्याचे निवेदन वजा तक्रार सादर करावी असे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांकडून देण्यात आलेल्या सुचनांना केंद्रस्थानी ठेवून दुपारी १ वाजताच्या सुमारास शिष्टमंडळाने संबंधितांना निवेदन सादर केले.पावडे चौकाला आले होते पोलीस छावणीचे स्वरूपसदर आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पावडे नर्सिंग होम चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसी बंदोबस्तामुळे पावडे चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोर्चा काढण्यात येऊ नये म्हणून संबंधितांना १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये उलट-सुलट चर्चा होत होती.
पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:10 IST
युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्याविरूद्ध रामनगर पोलीस ठाण्यात एपीआय यादव यांनी योगेश हिवंज याच्या तक्रारीवरून तक्रारकर्त्यांवर दबाव तंत्राचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केले. या प्रकरणी चौकशी करून एपीआय सचिन यादव यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी रामनगर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात येणार होता; पण आंदोलनच्या एक दिवसापूर्वी आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्यांना रामनगर पोलिसांनी १४९ अन्वये नोटीस बजावून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आला आहे.
पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देयुवा परिवर्तनचा आरोप : धडक मोर्चाचे होते आयोजन