शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात पोलिसांकडून खबऱ्यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 12:42 IST

वर्धेत गुन्ह्याचे श्रेय आपल्यालाच मिळावे म्हणून शहर ठाण्याच्या पोलिसांकडून चक्क खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देशहर पोलीस आणि एलसीबीत तपासावरून छुपा वादश्रेय लाटण्यासाठी सुरू आहे धडपड

आॅनलाईन लोकमतवर्धा : कोणताही गुन्हा शोधण्याकरिता पोलिसांचा महत्त्वाचा दुवा खबरी असतो. या खबऱ्यांच्या माध्यमातूनच पोलिसांना माहिती मिळून मोठमोठे आरोपी पकडल्याचा इतिहास आहे. वर्धेत मात्र गुन्ह्याचे श्रेय आपल्यालाच मिळावे म्हणून शहर ठाण्याच्या पोलिसांकडून चक्क खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून खबऱ्यांना धमकाविण्याचा प्रकार होत असेल तर गुन्हेगारांची माहिती देण्यास कोण समोर येईल, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. केवळ खात्याचा रिवार्ड आणि अधिकाऱ्यांकडून पाठीवर थाप याकरिता हा प्रकार घडल्याची चर्चा पोलीस विभागात आहे.खबरे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ओळख मिळवून आहेत. त्यांच्याच आधारावर पोलिसांचे बरेचशे तपास लागतात. यामुळे गुन्हे अन्वेषणाच्या कामात त्यांना विशेष महत्त्व आहे. याच खबºयांच्या आधारावर वर्धेत गत आठवड्यात जिल्हा सामान्य रुग्णालयालगत घडलेल्या हत्या प्रकरणाचा शोध लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शक्य झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेली ही कारवाई शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना खटकली. शहर ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी पकडणे शहर पोलिसांना जमले नाही, असे ताशेरे वरिष्ठांनी त्यांच्यावर ओढल्याची माहिती आहे. यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती पुरविणाऱ्या त्या खबऱ्यांचा शोध घेतला.हा शोध घेताना या पोलिसांकडून खबरी असलेल्या व काही नसलेल्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला. कधी काही अवैध कामे करणाऱ्यांना पोलिसांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यांचा हा रोष कायमच असताना पोलिसांच्या हाती दुसरा आरोपी आला. पण शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या आरोपीला ओळखणे शक्य झाले नाही. यामुळे तो त्यांच्या हाती असतानाही त्यांना गवसला नाही. परिणामी काल रात्री या भागातील नागरिकांनी स्वत: त्या आरोपीला पोलीस ठाण्यात आणत ठाणेदाराच्या स्वाधीन केले.आरोपीच्या शोधाची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि शहर ठाण्याच्या पोलिसात असा छुपा वाद असल्याचे या प्रकरणातून उघड झाले. हा वाद आजचा नाही तर यापूर्वीही होता. पण तो उघड झाला नव्हता. या प्रकरणात हा प्रकार उघड झाला. यावर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई गरजेची झाली आहे. पोलिसांकडून असेच प्रकार घडत असल्यास पुढे येवून कोणीच माहिती देणार नाही.लोकाभिमुख सेवेला छेदाची शक्यताच्पोलीस विभागाचे काम लोकाभिमुख करण्यावर शासनाच्यावतीने गृह खाते भर देत आहे. परंतु पोलिसांकडून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या वागणुकीत काहीच बदल झाला नसल्याची अनेक प्रकरणे आहेत. आता तर केवळ अधिकाऱ्यांची मर्जी राखण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांकडून खबऱ्यांनाच धमकाविण्याचा प्रकार होत आहे. या प्रकारातून प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या प्रकाराला छेद देण्याची शक्यता नाकारता येत नाही.रोष टाळण्याकरिता नागरिकांनीच केला आरोपी स्वाधीनच्जिल्हा सामान्य रुग्णालयालगत घडलेल्या हत्याकांडातील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केला. दुसरा आरोपी शहर पोलिसांच्या नजरेत असताना त्याला त्यांनी अटक केली नाही. केवळ चौकशी करून सोडले. मात्र दुसरा आरोपी तोच असल्याने या भागातील नागरिकांनी पोलिसांना प्रकरणाची माहिती देवून रोष ओढवून घेण्यापेक्षा त्या आरोपीला शहर ठाण्यात आणून ठाणेदाराच्या स्वाधीन केल्याचा प्रकार घडला.

टॅग्स :Crimeगुन्हा