शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्याने बोगदा केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:53 IST

सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील रेल्वे रुळा पलीकडे जाण्यासाठी असलेला भुयारी मागे (बोगदा) अखेर शेतकऱ्याने बंद केला. बोगद्यापर्यंत जाण्यासाठी असलेली जागा ही शेतकऱ्याच्या मालकीची असल्याने शनिवारी न्यायालयाच्या निकालानुसार पोलीस बंदोबस्तात या जागेचा ताबा सदर शेतकऱ्याने घेतला.

ठळक मुद्देतोडगा काढण्यासाठी दिलेल्या मुदतीकडे प्रशासनाने केले दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील रेल्वे रुळा पलीकडे जाण्यासाठी असलेला भुयारी मागे (बोगदा) अखेर शेतकऱ्याने बंद केला. बोगद्यापर्यंत जाण्यासाठी असलेली जागा ही शेतकऱ्याच्या मालकीची असल्याने शनिवारी न्यायालयाच्या निकालानुसार पोलीस बंदोबस्तात या जागेचा ताबा सदर शेतकऱ्याने घेतला. या शेतकऱ्याकडून तोडगा काढण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतु, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केले, असा आरोप होत असून शेतकऱ्याने जागेचा ताबा घेतल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.दहेगाव (गो.) येथील रेल्वे रुळा पलीकडे जाण्यासाठी एक बोगदा आहे. रेल्वे रुळा अलीकडे आणि पलीकडे वस्ती आहे. शिवाय विविध तसेच महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि गावे आहेत. त्यामुळे या बोगद्याचा ये-जा करण्यासाठी वापर करीत होते. मुख्य मार्गावरून बोगद्यापर्यंत जाण्यासाठी असलेला रस्ता हा नंदकिशोर शुक्ला आणि सुशीला उपाध्याय यांच्या मालकी हक्काचा आहे. या जमिनीबाबत वर्धा न्यायालयात २० वर्षांपासून खटला सुरू होता. याचा निकाल नुकताच चार वर्षांपूर्वी शेतकऱ्याच्या बाजूने लागला. मागील वर्षी न्यायालयीन बिलीप घटना स्थळावर येऊन ताबा घेण्याची प्रक्रीया होत असताना गावकऱ्यांकडून मोठा विरोध झाला. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाला एक वर्षाची मुदत देण्यात आली होती; पण बांधकाम विभागाने कुठलीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार पोलीस बंदोबस्तात जागेचा ताबा घेण्यात आला. यावेळी संतप्तांनी रोष व्यक्त केल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून चार कि.मी.अंतरावरून रस्त्याच्या व्यवस्थेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असल्याचे तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. वेळीच रस्ताची समस्या निकाली न निघाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.नागरिकांची समस्या लक्षात घेता पर्यायी व्यवस्थेचे काम तडकाफडकी सुरू केले आहे. ग्रा.पं.चा ठराव घेऊन कायम स्वरूपी रस्त्यासाठी उच्च स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येईल.- महेंद्र सोनोणे, तहसीलदार, सेलू.मी माझी जागा रस्त्यासाठी देण्यास तयार आहे. मात्र, माझ्या २० वर्षांच्या न्यायालयीन लढाईचा विचार करता मला २० वर्षाचे जागेचे भाडे आणि आजच्या बाजार भावानुसार जमिनीची किंमत संबंधितांनी दिली पाहिजे. माझी ही मागणी रास्तच आहे.- नंदकिशोर शुक्ला, शेतकरी.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक