शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

पोलीस ठाण्याचे काम अधांतरीच

By admin | Updated: September 16, 2015 02:49 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या तळेगाव (श्या.) परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्यामुळे येथील पोलीस चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला.

लोकप्रतिनिधींची उदासीनता : बांधकामाची फाईल धूळ खात पडूनअनिल रिठे  तळेगाव(श्या.पंत)राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या तळेगाव (श्या.) परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्यामुळे येथील पोलीस चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला. जागा कमी पडत असल्याने तत्कालीन आमदार दादाराव केचे यांनी अमरावती रोडवरील शासनाची जागा पोलीस स्टेशनसाठी मंजूर करून आणली. जमीन असल्यामुळे पोलीस ठाण्यासाठी दीड कोटी रूपयांचा निधीही मंजूर झाला. बांधकामाची फाईल पुढे पाठविण्यात आली. मात्र यात असंख्य चुका असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. परिणामी ती धुळखात पडली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे काम अधांतरीच असल्याचे वास्तव आहे. दोन वर्षापूर्वी तळेगाव पोलीस चौकीचे रूपांतर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आले. सुरूवातीला काही दिवस व्यवस्थित कारभार सुरू राहिला. काही दिवसांनी मात्र कर्मचारी वाढल्याने कुणाला कोठे बसवावे, असा प्रश्न उभा ठाकला. यात महिला कर्मचारी वर्गाची जास्त कुचंबना होत आहे. अपघातग्रस्त वाहनांची संख्या मोठी असल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात ही वाहने कोठे ठेवावी, हा प्रश्न आहे. १५ आॅगस्ट, २६ जानेवारी व १ मे रोजी ध्वजारोहणानंतर परेड कोठे घ्यावी, असाही प्रश्न पडतो.वरिष्ठ अधिकारी ठाण्याची पाहणी करण्याकरिता आल्यावर नियमानुसार त्यांना मानवंदना द्यावी लागते. ती देण्याकरिता येथे जागा नाही. ठाण्याचा आवारात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतत्र कक्ष नाही. स्वच्छतागृहही नाही. एवढेच काय या ठाण्याच्या इमारतीला कुंपणही घालण्यात आलेले नाही. त्यामुळे मोकाट प्राणी बिनधास्तपणे ठाण्याच्या आवारात संचार करीत असतात. मोठ्या कारवाईचे दस्तावेज तयार करावयाचे झाल्यास ते कोठे बसून तयार करावे, हा प्रश्न पडतो. एखाद्या गुन्ह्यातील ४ ते ५ साक्षीदार एकाचवेळी साक्ष नोंदवायला आले तर त्यांना कोठे बसवायचे व कर्मचाऱ्यांनी कोठे बसायचे हे देखील कळत नाही. पोलीस ठाण्याकरिता आर्वी मार्गावर जामनेर शिवारात १९९० मध्ये जागा दिल्या गेली होती. तेव्हा पोलीस स्टेशन मंजूर व्हायचे होते.पोलीस स्टेशन मंजूर झाल्यावर अमरावती मार्गावर जागेची पाहणी करण्यात आली. जागेच्या दस्तऐवजाच्या फाईलमध्ये जुनी फाईलही होती. पण आती ती कोठे धुळखात पडली आहे हे सांगण्यास अधिकारी तयार नाही. केवळ निधी देवून जबाबदारी पूर्ण झाल्याचे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी जागेच्या फाईलकडेही लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे. येथील पोलीस चौकीला ठाण्याचा दर्जा प्राप्त झाला. मात्र समस्यांना पाढा आ वासून उभा आहे. जागा कमी आणि कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असा प्रकार झाला आहे. कारवाई मध्ये व अपघातात जप्त केलेली वाहने कोणाच्याही दुकानासमोर लावली जातात. यात ती पुन्हा चोरीस जाण्याचा धोका वाढला आहे.