शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चौकी ठरते शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:02 IST

येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअपुरे मनुष्यबळ : पाच कर्मचाºयांच्या खांद्यावर कामाचा बोजा

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : येथील पोलीस चौकीचे काही वर्षापूवी लोक सहभागातून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी नामांकन देऊन चौकाला गौरविले होते. परंतु, सध्या या चौकीत अपुरे मनुष्यबळ असून अनेकदा कर्मचारीच गैरहजर राहत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.वायगाव (नि.) पोलीस चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेश असून त्या गावांची एकूण लोकसंख्या ३५ ते ४० हजाराच्या घरात आहे. परंतु, ज्या पोलीस कचेरीच्या खांद्यावर परिसरातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्याच पोलीस कचेरीत कर्मचाºयांचा वानवा आहे. या पोलीस चौकीत केवळ चार कर्मचारी व एक अधिकारी असे एकूण पाच पोलीस नेमण्यात आले आहे. मात्र, तेही या पोलीस चौकीत नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना वेळीच पोलिसी मदत मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांना वेळोवेळी विविध कामानिमित्त देवळी येथे पाचारण करण्यात येत असल्याचे पोलीस कर्मचारी सांगतात.या गावातून चंद्रपूर, पाढंरकवडा, यवतमाळ कडे जाणारा महामार्ग गेला आहे. या गावातील भुतडा हत्याकांड प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. परंतु, सध्या दररोज पोलीस गस्तही घालत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर पोलीस चौकी नेहमी बंद राहत असल्याचा आरोप नागरिक करतात. त्यामुळे तक्रारकर्त्याला बहूदा देवळी पोलीस ठाणे गाठून पोलीस कचेरीत तक्रार नोंदवून घ्यावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अपुऱ्या पोलिसांमुळे परिसरात दारूविक्री, सट्टापट्टी आदी व्यवसाय पायमुळ घट्ट करू पाहत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे.चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेशयेथील पोलीस चौकीच्या हद्दीत १२ गावांचा समावेश असून त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ४० हजारांच्या घरात आहे. येथे झालेल्या लोकसहभागाच्या कामाचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक करीत संबंधितांना गौरविले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी सदर पोलीस चौकी नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास सुरू राहण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अधिकारी बदलताच चौकी नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे