लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य अहोरात्र करणारे पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब ज्या ठिकाणी ते राहते त्या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष आहे.ब्रिटिशकाळात व तत्पूवीर्ही आज असलेले आर्वी शहर गावनदी पलीकडे होते. त्याला कसबा म्हणायचे. १९११ मध्ये आजचे पोलीस ठाणे चौकी म्हणून १९३५ पूर्वी श्रीराम प्राथमिक शाळेत (ओल्ड टाऊन) शाळेत होती. १९८१ च्या जनगणनेनंतर आर्वीतील आष्टी आणि कारंजा तालुके वेगळे करण्यात आले. आर्वीत सद्यस्थितीत जे पोलीस ठाणे आणि कर्मचारी वसाहत आहे, ती १९३५ सालची.तळेगाव, खरांगणा आणि पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत आर्वी तालुक्यातील काही गावांचे विभाजन करण्यात आले. सध्या या पोलीस ठाण्यांतर्गत ६६ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. तर पाच अधिकारी आहेत. पोलीस ठाण्याच्या आवारात २८ निवासस्थाने आहेत. यापैकी तीन निवासस्थाने मोडकळीस आली आहेत. काही निवासस्थानांची अतिशय दयनीय अवस्था असून तेथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच डागडुजी करून दुरुस्ती केली आहेत.तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रताप दिगावकर यांनी १९८४ च्या सुमारास प्रयत्न करून आर्वी-पुलगाव मार्गावरील मॉडेल हायस्कूलजवळ २४ कर्मचाऱ्यांकरिता वसाहतीची निर्मिती केली. वसाहतीतील याही निवासस्थानांची दुर्दशा झाली आहे. मोठमोठी झाडे आणि गवताने या निवासस्थानांना विळखा घातला आहे. सुविधांचा प्रचंड दुष्काळ आहे.या २४ निवासस्थानांपैकी केवळ आठ निवासस्थानांमध्ये कर्मचारी कसेबसे राहतात. अनेक कर्मचारी कुटुंब नसल्याने तडजोड करून राहतात. त्याचे भाडेही देतात. वीज देयक भरतात. रस्त्याची दुरवस्था असल्याने फौजदार गोपाळ ढोले यांनी अनेकदा बांधकाम विभागाला फोन केला तेव्हा कुठे त्यांनी या रस्त्यावर मातीमिश्रित मुरूम टाकला.ब्रिटिशकालीन उपविभागीय पोलिस अधिकारी आणि ठाणेदार यांची निवासस्थानेही जुनी असून मोडकळीस आल्याने डागडुजी करण्यात आली आहे. उर्वरित अधिकारी व जवळपास तीस कर्मचारी हे किरायाच्या घरात राहतात. कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणारे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाची आजही दुरवस्था आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी पाठपुरावा करणे अगत्याचे आहे
पोलीसदादांचे मोडकळीस आलेल्या निवासस्थानातच वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST
ब्रिटिशकाळात व तत्पूवीर्ही आज असलेले आर्वी शहर गावनदी पलीकडे होते. त्याला कसबा म्हणायचे. १९११ मध्ये आजचे पोलीस ठाणे चौकी म्हणून १९३५ पूर्वी श्रीराम प्राथमिक शाळेत (ओल्ड टाऊन) शाळेत होती. १९८१ च्या जनगणनेनंतर आर्वीतील आष्टी आणि कारंजा तालुके वेगळे करण्यात आले. आर्वीत सद्यस्थितीत जे पोलीस ठाणे आणि कर्मचारी वसाहत आहे, ती १९३५ सालची.
पोलीसदादांचे मोडकळीस आलेल्या निवासस्थानातच वास्तव्य
ठळक मुद्देब्रिटिशकालीन वसाहत। पोलीस विभागाचे पाठपुराव्याकडे अक्षम्य दुर्लक्ष