शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार १८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळ्यामध्ये भुईमुगाच्या पेऱ्यात घट झाली असून सोयाबीन व मुगाचा पेरा वाढल्याचे कृषी विभागाच्या पीकपेरणी अहवालातून दिसून येत आहे. तालुक्यामध्ये २ हजार १८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांचा पेरा असून १९६.८ हेक्टरवर सोयाबीन, ८२८.५ हेक्टरवर भुईमूग, ३००.२ हेक्टरवर भाजीपाला, ६०० हेक्टरवर चारा पिके, १४२.२ हेक्टरवर मूग, ४३.८ हेक्टरवर तीळ, २३.६ हेक्टरवर मसाला पिके, २८.१ हेक्टरवर टरबूज, २ हेक्टरवर ऊस तर १८ हेक्टरवर इतर पिकं आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (घोराड) : सेलू तालुक्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरीप व रब्बी हंगामात पिकं घेतली जातात. यावर्षी खरीप आणि रब्बीमध्ये फटका बसल्याने शेतकऱ्यांनी उत्पन्नातून तूट भरून काढण्यासाठी उन्हाळी पिकांना पसंती दिली. तालुक्यामध्ये २ हजार १८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड केली असून यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळ्यामध्ये भुईमुगाच्या पेऱ्यात घट झाली असून सोयाबीन व मुगाचा पेरा वाढल्याचे कृषी विभागाच्या पीकपेरणी अहवालातून दिसून येत आहे. तालुक्यामध्ये २ हजार १८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांचा पेरा असून १९६.८ हेक्टरवर सोयाबीन, ८२८.५ हेक्टरवर भुईमूग, ३००.२ हेक्टरवर भाजीपाला, ६०० हेक्टरवर चारा पिके, १४२.२ हेक्टरवर मूग, ४३.८ हेक्टरवर तीळ, २३.६ हेक्टरवर मसाला पिके, २८.१ हेक्टरवर टरबूज, २ हेक्टरवर ऊस तर १८ हेक्टरवर इतर पिकं आहेत. जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत उत्पन्न देणारे यातील काही पिकं असल्याने शेतकऱ्यांनी एका वर्षांत तीन पिके घेण्याचे धाडस केले आहे. मात्र, सोयाबीन व मूग याचा पेरा वाढल्याने भुईमुगाच्या लागवडीत घट झाली आहे. हिंगणी, खापरी व जुनगढ या भागात मोठ्या प्रमाणात भुईमूग घेतला जातो. पण महागड्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे बोलल्या जात आहे.

भुईमूग घेणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी सोयाबीन, मूग व तीळ हे पीक घेतल्याने भुईमुगाच्या पेऱ्यात घट आली आहे. आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी रासायनिक खताचे नियोजन करून खरेदी करावे. त्यामुळे खताची कमतरता भासणार नाही.- एस. आर. मुरारकर, कृषी अधिकारी, पंचायत समिती सेलू.

 

टॅग्स :agricultureशेती