शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सात दिवसांत तालुक्यात १ लाख १७ हजार ७७७ झाडांचे रोपण

By admin | Updated: July 9, 2017 00:41 IST

शासनाची योजना न समजता एक राष्ट्रीय जबाबदारी म्हणून एखादा शासकीय अधिकारी सर्वांना सोबत घेऊन काम करतो,

 २० शाळांचा सहभाग : मागील वर्षीची ८५ टक्के झाडे जिवंत, सामाजिक संस्था, संघटनांचाही सहभाग लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : शासनाची योजना न समजता एक राष्ट्रीय जबाबदारी म्हणून एखादा शासकीय अधिकारी सर्वांना सोबत घेऊन काम करतो, तेव्हा निश्चित योजनेची फलश्रुती होते. याचा प्रत्यय वनविभागाच्या यंदाच्या वृक्षारोपण अभियानातून आला. येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विजय तळणीकर यांची कल्पकता व श्रमाने तालुक्यात सात दिवसांत १ लाख १७ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी तळणीकर यांनी वन विभागाचे सर्व कर्मचारी, तालुक्यातील २० शाळा, महाविद्यालय व शिक्षक तथा सामाजिक संस्था यांना सोबत घेत १ ते ७ जुलैपर्यंत १ लाख १७ हजार ७७७ झाडे लावून आपले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या वाट्याला १ लाख ९७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी १ लाख १७ हजार ७७७ रोपे एकट्या वनविभागाला लावावयाची होती. उर्वरित ८० हजार रोपे विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेने लावायची होती. वन विभागाच्या वाट्याला आलेल्या १ लाख १७ हजार ७७७ रोपांपैकी चिंचोली वन परिसरात ३३ हजार, धावसा क्षेत्रात २७ हजार, नांदोरा वन परिसरात २२ हजार, सिंदीविहिरी परिसरात २७ हजार ५०० व मरकसूर परिसरात ७ हजार ७७७ झाडे तळणीकर यांच्या कल्पकतापूर्ण नियोजनातून १ ते ७ जुलै या कालावधीत लावण्यात आली. सर्वप्रथम वनमजूर व इतर मजुरांकडून योग्य मापाचे खड्डे तयार करून घेण्यात आले. यानंतर प्रत्येक शाळेला विनंती पत्र देत प्रत्येकी ५० ते १०० मुले व शिक्षक मागविण्यात आले. झाडे लावणाऱ्या मुलांची ने -आण करण्याची व्यवस्था करण्यात आली. मॉडेल हायस्कूल, कस्तुरबा शाळा, राजीव गांधी, गुरूकुल कॉन्व्हेंट, सनशाईन स्कूल, इंदिरा कन्या शाळा, या शाळांच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार वन परिसरात जाऊन झाडे लावलीत. आयटीआय व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली. वृक्षारोपणाचा प्रारंभ १ जुलै रोजी सभापती मंगेश खवशी तसेच जि.प. सदस्य सुरेश खवशी, सरिता गाखरे, रोषणा ढोबाळे, शिवसेना तालुका प्रमुख संदीप टिपले यांच्या हस्ते करण्यात आला. मधल्या काळात माजी आमदार दादाराव केचे, विद्यमान आ. अमर काळे यांनाही वृक्षारोपणात सहभागी करून घेण्यात आले. २००० विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेतला. समारोप ७ जुलै रोजी खरसखांडा वनपरिक्षेत्रात झाला. सर्व अधिकाऱ्यांनी या पद्धतीने काम केल्यास राज्य प्रदूषणरहित होण्यास मदत होऊ शकणार आहे. मागील वर्षीची ८५ टक्के झाडे जगली मागील वर्षीही याच अभियानांतर्गत पळसकुंड वन क्षेत्रात ६० हेक्टरमध्ये १ लाख १२ हजार झाडे तळणीकर यांच्या मार्गदर्शनात लावण्यात आली होती. सदर झाडांची देखभाल करण्यासाठी सतत तीन मजूर वर्षभर काम करीत होते. नियमितपणे खते टाकून, निंदण करून, प्राण्यांपासून झाडांचे संरक्षण करण्यात आले. एवढेच नव्हे तर प्रत्येक झाडाखाली सलाईनची रिमाकी बॉटल ठेवून त्याद्वारे पाणी देण्यात आले. परिणामी, मागील वर्षी लावलेल्या झाडांपैकी ८५ टक्के झाडे आजही जिवंत असून सन्मानाने डोलत आहेत. हा वृक्षारोपण मोहिमेतील आदर्श ठरू शकेल.