शरद निंबाळकर : महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदवर्धा : औषधी वनस्पतींची शास्त्रीय पद्धतीने लागवड करून आधुनिक शेतीला या व्यवसायाची जोड आता शेतकऱ्यांनी दिली पाहिजे. सोबतच संशोधक, विद्यार्थ्यांनी विविध औषधी वनस्पतींचा गुणात्मक दर्जा तपासून त्याचा वापर व्याधींवर कसा करता येईल, या दृष्टीने संशेधन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित म.गांधी आयुर्वेद महाविद्यालय, अनुसंधान केंद्राद्वारे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित आहे. औषधी वनस्पतींची लागवड, संरक्षण व संवर्धन विषयावरील परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप गोडे, प्रकुलगुरू डॉ. व्ही.के. देशपांडे, विशेष कार्य अधिकारी अभ्यूदय मेघे, अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, डॉ. प्रीती देसाई, डॉ. प्रसाद, डॉ. खोब्रागडे उपस्थित होते. औषधी वनस्पतींची रोपे देत मान्यवरांचे स्वागत केले गेले. प्रास्ताविक डॉ. खोब्रागडे यांनी केले. डॉ. भुतडा यांनी पारंपरिक वैद्यांची राष्ट्रीय परिषद घेतली जाईल, असे सांगितले. संचालन डॉ. सुप्रिया कल्लीनपूर यांनी केले तर आभार डॉ. शंभरकर यांनी मानले. डेहराडूनच्या वनसंशोधन संस्थेचे डॉ. बिसेन यांनी मार्गदर्शन केले. राज्याच्या विविध विभागांसह गुजरात, पंजाब, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगढचे संशोधक, अभ्यासक व शेतकरी सहभागी झाले असून परिषदेचा समारोप शुक्रवारी होणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
शेती व्यवसायपूरक औषधी वनस्पतीची लागवड करा
By admin | Updated: December 11, 2015 02:51 IST