शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आता नियोजन खरिपाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:18 IST

बांधावरच सूर्योदय अन् सूर्यास्त पाहणाऱ्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या असल्याने येणाऱ्या खरीप हंगामात कोणते पीक घेतल्याने आर्थिक सुबत्ता येईल, याकडे लक्ष देऊनच खरिपाचे नियोजन करताना शेतकरी दिसत आहे.

ठळक मुद्देया हंगामात तरी सुबत्तेची शेतकऱ्याला आशा : आर्थिक जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : बांधावरच सूर्योदय अन् सूर्यास्त पाहणाऱ्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या असल्याने येणाऱ्या खरीप हंगामात कोणते पीक घेतल्याने आर्थिक सुबत्ता येईल, याकडे लक्ष देऊनच खरिपाचे नियोजन करताना शेतकरी दिसत आहे.पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्याला चांगले दिवस येईल, ही आशा फोल ठरल्याने नशिबाला दोष देऊन आपली शेती करून आपले जीवन जगावे, अशी भावना आहे. अवघ्या एक महिन्यावर असलेल्या मृग नक्षत्राकडे लक्ष लागले असल्याने बियाण्यांची निवड, मिळणारे भाव, याचा अंदाज लावला जात आहे कपाशी, सोयाबीन हीे दोन मुख्य पिके खरीप हंगामात घेतली जातात. मागील हंगामाचा विचार पूर्वपेरणी अगोदर केला जात आहे. या हंगामात दोन्ही पिके समसमान राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापसाला उलंगवाडीनंतर मिळालेला सहा हजारांहून अधिक भाव पुढीलवर्षी असाच राहील का, याचे अनुमान काढून भावाची आशा पाहता कपाशीचा पेरा अधिक होण्याची शक्यता आहे. खरीप अवघ्या एक महिन्यावर असताना जाणवत असलेली भीषण पाणीटंचाई व वेळेवर पाऊस आला नाही तर नियोजन बिघडेल का, अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहे. बियाणे रासायनिक खते, याची जुळवाजुळव करण्यासाठी आर्थिक तरतूद केली जात असल्याचे दिसून येत आहे. शेताची उन्हाळवाही झाल्याचे चित्र असून वाढत्या तापमानामुळे शेतीचे कामे थांबले आहे. जनावरांचा पाणी, वैरणाचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. कपाशीचा बियाणे, खत, फवारणी व वेचणी हा खर्च पाहता पीक सद्यस्थितीत परवडणारे नसल्याचे शेतकरी सांगतात. सोयाबीनचे अलीकडे घटत असलेले उत्पादन चिंतेचा विषय आहे . वाढत्या खर्चात विजेचे बिल, घरखर्च, मुलांचे शिक्षण व इतर खर्च शेतीतील उत्पन्नातून करावा लागतो. यामुळे शेतकरी सातत्याने कर्जात राहत असल्याची वास्तविकता आहे. या कर्जाच्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना संकटाचा सामना करीत हातात आलेले उत्पन्न हेच वर्षभराची जीवन जगण्याची पुंजी असते. रब्बी हंगामावर अवलंबून राहणे आता कठीण झाले आहे. खरिपाचे नियोजन हे पक्के असण्यासाठी शेतकरी आता कामाला लागले असले तरी पेरा कोणत्या पिकाचा जास्त असेल, हे पावसावर अवलंबून राहणार आहे.खरिपावर वर्षभराचा डोलारासेलू तालुक्यात केळी पिकाकडे पाठ फिरविल्यानंतर शेतकऱ्यांचा कापूस पीक घेण्याकडे कल आहे. चांगले उत्पादन घेण्यासाठी महागडा खर्च केला जातो; पण वर्षभराचा खर्च खरिपाच्या पिकावर चालावा, ही अपेक्षा असते.अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढलेले बी-बियाण्यांचे भाव, रासायनिक खतांचा भाव पाहता कपाशी व सोयाबीन मालाचे भाव पेरणीपूर्व जाहीर झाल्यास नियोजन करणे सोपे जाईल, असे शेतकरी बोलत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती