शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

नियोजन करणारेच जीवनात यशस्वी होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:31 IST

जी माणसे जीवनात नियोजन करून जगतात, तीच यशस्वी होतात. नियोजनाशिवाय यश नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संबंध जीवनात नियोजनाला महत्त्व दिले. महाराजांचा मृत्यू वगळता साऱ्याच गोष्टींचे नियोजन त्यांनी केले.

ठळक मुद्देनितीन बानगुडे पाटील : मेधावी युवा महोत्सवात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जी माणसे जीवनात नियोजन करून जगतात, तीच यशस्वी होतात. नियोजनाशिवाय यश नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संबंध जीवनात नियोजनाला महत्त्व दिले. महाराजांचा मृत्यू वगळता साऱ्याच गोष्टींचे नियोजन त्यांनी केले. आज तरूणाईत नियोजनाचा अभाव आहे. या तरूणांना आकाशात झेप घेण्याची भरारी आईवडिलांनी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन लेखक व विचारवंत नितीन बानगुडे पाटील यांनी केले.सारथी बहउद्देशीय संस्था, स्वामी विवेकानंद विचार केंद्र व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने दोन दिवसीय मेधावी भारत युवा महोत्सवाचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या सत्रात ‘सोड नाराजी घे भरारी‘ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.महोत्सवाचे उद्घाटन शहीद अधिकारी प्रफुल्ल मोहोरकर यांच्या मातोश्री सुधा मोहोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष अतुल तराळे, महोत्सवाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री, सिंदी ड्रायपोर्टचे संचालक प्रशांत बुर्ले, विवेकानंद केंद्राचे वर्धा प्रमुख प्रा. शेषराव बावणकर आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मोहोरकर म्हणाले, भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. आपण या पावनभूमीत जन्माला आलो, ही भाग्याची गोष्ट आहे.आज देशात अध:पतन मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे रोखण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले. मागील आठ वर्षांपासून शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजक अविनाश देव यांनी सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून २ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही कार्यशाळा व्यक्तीच्या दृष्टी बदलण्यासाठी लाभदायक ठरणारी आहे, असे सांगितले.नितीन बानगुडे पाटील म्हणाले , चिंतन विचारातून होते. विचार हे मनातून येतात. माणसाचा पराभव पहिले मनात होतो. त्यानंतर तो रणांगणात होतो. तुमचा पराभव कुणीच रोखू शकत नाही. तुमचे मन ठाम असायला हवे, कुणीही प्रगती प्रगती रोखू शकणार नाही. माणूसच माणसाला घडवितो आणि बिघडवितो. आपला निश्चय पक्का असायला हवा. कष्ट करण्याची तयारी हवी, संधी निर्माण करावी लागते, ती चालून येत नाही. संधी आली, पण ती हुकली असे म्हणण्याची वेळ येऊच देऊ नका. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, यावर साºया गोष्टी अवलंबून आहे. आत्मविश्वास हा संसर्गजन्य आहे. स्वत:ला मर्यादा घालून जगू नका, बंधन घालून जगू नका, अनुभवातून नवनिर्माण होते. त्यामुळे गरूडझेप घेण्याची तयारी ठेवा, संघर्ष तुमची उंची वाढवितो. कष्टाचे फळ प्रत्येकालाच मिळते. त्यामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. सातत्य, चिकाटी हे सामर्र्थ्यशाली शस्त्र आहेत. अशा परिस्थितीत अनुभव हा सर्वोत्तम गुरू आहे. यश आणि अपयश यामध्ये भिती उभी असते. तुम्ही कृती केल्यावर विश्वास निर्माण होतो. त्यामुळे कृती करा व स्वत: विषयीचा आत्मविश्वास वाढवा, या साºया बाबी त्यांनी विविध दाखले व उदाहरण देऊन समजावून सांगितल्या. बानगुडे यांचा परिचय सुमित उरकुडकर यांनी करून दिला.कार्यक्रमाचे संचालन प्रेम महिले व मेघा मेश्राम यांनी केले. त्यानंतर दुसºया सत्रात पालकत्व एक कला या विषयावर प्रभू अमोघ लीला यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शहरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.