देवळी : थोर समाजसेवक व माजी आमदार महादेव ठाकरे यांचा स्थानिक बाजार चौकातील अर्धाकृती पुतळा हटविण्याची शक्यता आहे. हा पुतळा अन्यत्र हलविण्यात येऊ नये, अशी मागणी पुतळा समितीने केली आहे. याबाबत तहसीलदार तेजस्विनी जाधव व नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. देवळीच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी, माजी आमदार व समाजसेवक म्हणून ठाकरे यांचा लौकिक होता. त्यांच्या प्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी ५० वर्षांपूर्वी बाजार चौकात ठाकरे यांचा अर्धाकृती बसविला होता; पण त्यांचा नवीन पुतळा अन्यत्र बसविण्यासह बाजार चौकातील हा पुतळा पालिकेद्वारे हटविला जाणार असल्याचा आरोप पुतळा समितीने केला आहे. याबाबत पालिका प्रशासन व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात अशोक राऊत, अब्दुल जब्बार तंवर, किशोर देशकर, गौतम पोपटकर, दादा मून आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)बाजार चौकातील आहे त्याच जागेवर महादेवराव ठाकरे यांचा नवीन पुतळा बसवून सौंदर्यीकरण केले जाणार आहे. यामुळे पुतळ्याची नियोजित जागा बदलण्यात येणार असल्याच्या वावड्या कपोलकल्पित आहे.- शोभा तडस, नगराध्यक्ष, नगर परिषद, देवळी.
‘त्या’ पुतळ्याची जागा बदलवू नये
By admin | Updated: December 15, 2015 04:17 IST