शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पिपरीच्या पांदण रस्ता कामात गैरप्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:29 IST

लिंगा (मांडवी) या रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिपरी येथील पांदण रस्त्याचे काम नरेगा शासकीय योजनेतून ११ लाख रूपये खर्चून करण्यात आले. सदर काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून इस्टीमेटनुसार हे काम झाले नाही. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : लिंगा (मांडवी) या रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिपरी येथील पांदण रस्त्याचे काम नरेगा शासकीय योजनेतून ११ लाख रूपये खर्चून करण्यात आले. सदर काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून इस्टीमेटनुसार हे काम झाले नाही. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.सदर पांदण रस्त्यावर मुरुम व गिट्टीचा वापर करणे अनिवार्य होते. परंतु त्याच्याऐवजी केवळ माती टाकण्यात आली. त्यामुळे पांदन रस्त्याचे काम होण्यापूर्वी येण्या-जाण्यास सहज सुलभता होती. परंतू काम झाल्यापासून पायी चालनेही कठीण झाले आहे.या पांदण रस्त्याच्या निकृष्ठ कामामुळे शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. या रस्ताकामात गैरप्रकार झाला असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गावकºयांनी केली. या संदर्भात पिपरी ग्रामपंचायतचे सचिव बन्नगरे यांना विचारणा केली असता त्यांनी या कामासाठी ११ लाख रूपयापैकी अडीच लाख रूपये निधी शासनाकडून आतापर्यंत आला. उर्वरीत ८.५० लाख रूपये निधी येणे बाकी आहे. या कामात कुठलाही गैरप्रकार झालेला नाही. तसेच अजूनही काम पूर्ण झालेले नाही, अशी माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे.पांदण रस्त्याने वाढविली अडचणशेतकऱ्यांचा त्रास दूर व्हावा याकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पांदण रस्ता विकास कार्यक्रम राबविला. पांधन रस्ते मोठे झाले. बाजूला नाल्या झाल्या पण पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना शेती साहित्य बंडीतून नेणे कठीण झाले आहे.कामाची तक्रार आपल्याकडे आली असून विस्तार अधिकारी व अभियंता यांना प्रत्यक्ष कामाच्यास्थळी जावून पंचनामा करण्यास सांगितले आहे. या कामात कुशल आणि अकुशल असे दोन प्रकारचे कामे असतात. दोनही निधी वेगवेगळे असतात. त्यामुळे कोणत्या कामावर किती निधी खर्च झाला, याची चौकशी केली जाईल.-उमेश नंदागवळी, संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, कारंजा.