शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

पिंपळझरी बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:23 IST

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. पहिल्या दिवशी केवळ पाऊस आल्याने नागरिकांना आपण गारपिटीच्या तडाख्यातून सुटलो असे वाटत असतानाच सोमवारी दुपारी पुलगाव आणि आर्वी परिसराला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

ऑनलाईन लोकमतवर्धा /रोहणा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. पहिल्या दिवशी केवळ पाऊस आल्याने नागरिकांना आपण गारपिटीच्या तडाख्यातून सुटलो असे वाटत असतानाच सोमवारी दुपारी पुलगाव आणि आर्वी परिसराला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. या भागात सुमारे अर्धा तास गार पडल्याने हिरवी शेती, काळी जमीन आणि रस्ते गारांची आच्छादल्याचे दिसून आले. या गारांच्या माऱ्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. समुद्रपूर तालुक्यातील पारोधी येथे वीज कोसळल्याने गाय व बैलाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी गारपीट झाल्यानंतर सांयकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रोहण्यालगतच्या पिंपळझरी गावाला चांगलाच तडाखा बसला. येथील नागरिकांच्या घरावरील छत उडाली. अनेकांच्या भिंती कोसळल्या, तर आकोली भागात झाडे उन्मळून पडली. या नुकसानीच्या भपाईकरिता नागरिक रस्त्यावर आले. वर्धेत दिवसभर पावसाची हजेरी होती. मात्र रात्री पावसासह आलेल्या गारांमुळे सर्वांनाच भांबावून सोडले.१२ फेब्रुवारीची सायंकाळ रोहणा परिसरात पिंपळझरी गावाकरिता काळच ठरली. यावेळी अचानक आलेल्या पावसासह वादळी वारा आणि गारपीटीमुळे हे गाव पुरते उद्ध्वस्त झाले. गावातील सर्वच घरांची मोडतोड होवून साहित्य अस्ताव्यस्त झाले. पाच-सात व्यक्तीं व जनावर जखमी झाले. विद्युत खांब उन्मळून पडल्याने ग्रामस्थांना काळोखाचा सामना करावा लागला.रोहणा परिसरातील रोहणासह मारडा, सालदरा, वाई, बोदड, बोथली या गावांना गारपीटीने अक्षरश: झोडपून काढले. यात पिंपळझरी या आदिवासी बहुल गावाला जबरदस्त फटका बसला. आज या गावात राहण्याकरिता घर व जेवणासाठी अन्न नसल्याचे चित्र आहे. गावात कोलाम या आदिवासी समाजाची ४५ ते ५० घरे आहेत. ही सर्व घरे उडून गेलीत. घरातील साहित्य अस्ताव्यस्त झाले. प्रभाकर राड्डी, चंद्रमुखी राड्डी, दिवाकर शिरबंदी, निर्मला शिरबंदी, हरिदास राड्डी, दिनेश कुंडी, दमडू घरगडी यांच्यासह त्यांची जनावरे जखमी झाली. गावात सर्वत्र आक्रोश आहे. शेतातील गहू, चणा, कापूस ही पूर्णत: नष्ट झाली आहे. सदर घटना समजताच सामाजिक कार्यकर्ते माजी जि.प. सदस्य तथा विद्यमान जि.प. सदस्य ज्योती निकम यांचे पती गजानन निकम यांनी पिंपळझरी येथील संपूर्ण गावकऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली. तर रोहणा येथील सकस आहार या वस्तीतील नागरिकांना ब्लँकेट वाटप केले. जखमींना आर्वी येथील दवाखान्यात पाठविण्यासाठी माजी सरपंच गणेश गजकेश्वर यांनी धावपळ केली. पीडितांना सहकार्य करण्यासाठी पिंपळधरीच्या सरपंचा चंदा दौलत कुंडी, रोहण्याचे सरपंच सुनील वाघ, माजी जि.प. सदस्या तृप्ती पावडे, आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पावडे यांनी सहकार्य केले. शासनातर्फे नायब तहसीलदार मस्के यांनी गावाला भेट दिल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी सकाळी तलाठी ऐकापुरे घटनास्थळी येवून नुकसानीची पाहणी करीत होते.देवळी तालुक्याला सर्वाधिक फटकानाचणगाव - सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीचा फटका देवळी तालुक्यातील सेंदरी, सोनोरा, कांदेगाव, इंझाळा, नाचणगाव, आपटी, वाघोली, विजयगोपाल, कोळोणा या गावांना मोठ्या प्रमाणात बसला. य गारपीटीमुळे गहू, चना व इतर भाजीपिकांना चांगलाच फटका बसला. खरीप पाठोपाठ रबी हंगामानेही शेतकऱ्यांच तोंडचा घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिसकावून नेल्याने तो हवालदिल झाला. तालुक्याला बसलेल्या गारींच्या फटक्याची पाहणी खासदार रामदास तडस यांनी सेंदरी या गावाला भेट देत केली.पक्ष्यांनाही गारांचा माराया गारपिटीचा तडाखा शेतशिवारांसह पक्ष्यांनाही बसला आहे. गारांच्या माऱ्यामुळे अनेक पक्षी गंभीर जखमी झाले तर काहींना प्राण गमवावे लागले आहे.

टॅग्स :Rainपाऊस