शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आईसक्रीमच्या फॅमिली पॅकमध्ये काचेचा तुकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:50 IST

फॅमिली पॅकमधील अमूल कंपनीचे आईसक्रीम कुटुंबियांसोबत खात असताना एक मोठा काचेचा धारदार तुकडा लहान मुलीच्या तोंडात आढळून आला. काचेच्या तुकड्यामुळे तिचे तोंड रक्तबंबाळ झाले.

ठळक मुद्देलहान मुलीचे तोंड रक्तबंबाळ : कंपनीला सील लावण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : फॅमिली पॅकमधील अमूल कंपनीचे आईसक्रीम कुटुंबियांसोबत खात असताना एक मोठा काचेचा धारदार तुकडा लहान मुलीच्या तोंडात आढळून आला. काचेच्या तुकड्यामुळे तिचे तोंड रक्तबंबाळ झाले. कुटुंबातील सर्व जण एकत्र आईसक्रीम खात असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. संबंधित दुकानदाराकडे धाव घेत सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन विभाग यांच्याकडे तक्रार केली. लोकांच्या जीवावर उठलेली ही कंपनी सीलबंद करावी, या कंपनीचा आईसक्रीमचा माल नष्ट कराा, अशी मागणी करण्यात आली.स्थानिक आंबेडकर वॉर्ड येथील अमर रामकृष्ण मुरार यांनी देवळीतील एका दुकानदाराकडून एक किलो वजन असलेले अमूल कंपनीचे ‘फ्रुट अ‍ॅण्ड नट फन्टासी’ आईसक्रीम विकत घेतले. आईसक्रीमचा फॅमिली पॅक घरी आणून कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून खात होते. दरम्यान, आईसक्रीम सोबतच एक मोठा काचेचा धारदार तुकडा लहान मुलीच्या तोंडात गेला. आईसक्रीम खात असताना या मुलीच्या तोंडातून रक्त येत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. तोंडात बोट टाकून चाचपणी केली असता एक मोठा काचेचा धारदार तुकडा आढळून आला. ही बाब त्वरित लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.कुटुंबीयांसाठी ही घटना अंगाचा थरकाप उडविणारी होती, अशी भावना मुरार यांनी तक्रारीत नमूद केली आहे. खाद्यपदार्थाच्या नामवंत कंपन्यांकडूनही जीवितास धोका निर्माण होऊ शकतो हीच बाब या माध्यमातून समोर आली आहे. या घटनेमुळे या कंपनीचा बाजारामध्ये असलेला संपूर्ण माल नष्ट करण्यात यावा. तसेच या कंपनीचे आईसक्रीमचे उत्पादन बंद करण्यात यावे, अशी मागणी मुरार यांनी तक्रारीतून केली आहे. याबाबत कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काचेचा तुकडा सापडलेला आईसक्रीमचा बॅच सील करून अ‍ॅनालिसीससाठी पाठविला आहे. अमूल आईसक्रीमच्या संपूर्ण स्टॉकची तपासणी करून संबंधितांना पत्र देण्यात आले आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.- रवीराज धाबर्डे, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, वर्धा.