शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

पुलगाव बॅरेज पूर्ण झाल्यास सुटेल पाणीप्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:19 IST

निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुलगाव जवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने मे २०१० पासून पुलगाव बॅरेजचे काम सुरू आहे. आज जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून केवळ १० टक्के बांधकाम शिल्लक असून येत्या काही महिन्यात तेही पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनदीकाठच्या १३ गावांना मिळणार दिलासा : ३ हजार २३६ हेक्टर क्षेत्र येईल ओलिताखाली

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुलगाव जवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने मे २०१० पासून पुलगाव बॅरेजचे काम सुरू आहे. आज जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून केवळ १० टक्के बांधकाम शिल्लक असून येत्या काही महिन्यात तेही पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास नदीकाठच्या १३ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असल्याचे चित्र दिसत आहे.तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आॅक्टोबर २००९ मध्ये या ९६ कोटींच्या पुलगाव बॅरेजचे प्रतीकात्मक भूमिपूजन केले होते. मात्र प्रत्यक्ष बांधकाम मे २०१० मध्ये सुरू होऊन तीन-चार वर्षांत या बॅरेजचे बांधकाम पूर्ण होईल, असे अपेक्षीत होते. परंतु शासनाच्या लालफीतशाहीत व संबंधित कंत्राटदार कंपनीला केलेल्या कामाचे बिल न मिळाल्यामुळे काही काळ हे काम रखडले. ९६ कोटींचा पुलगाव बॅरेज तीनशे कोटीवर पोहोचला. पुढे सत्ता परिवर्तन झाल्यामुळे कामाची गती मंदावली. अखेर केंद्रशासनाने निम्न वर्धा प्रकल्पाचे काम हाती घेतले. आज हे काम जवळपास पूर्णत्वास गेले असून केवळ १० टक्के बांधकाम होणे आहे.या पुलगाव बॅरेजची एकूण क्षमता १०.८० द.ल.घ.मी असून उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. एवढा आहे. या बॅरेजची लांबी २२५ मीटर असून १४.१७ मीटर उंची, ६.५० मीटर रूंदी आहे. यात ६५० मीटर पाणी राहणार आहे. तर १०.८० द.ल.घ.मी. पाणी साठविण्याची क्षमता राहणार आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी १० बाय ६ फुटांचे १५ दरवाजे आहेत.बॅरेजचे काम पूर्ण झाल्यावर पुलगाव शहरासह केंद्रीय दारूगोळा भांडार व परिसरातील पिंपरी, पारगोठाण, धनोडी, रोहणा, विरूळ, सोरटा, रसुलाबाद, मार्डा, गुंजखेडा, नाचणगाव, कवठा, मलकापूर इत्यादी गावांची पाणी समस्या कायमची सुटणार आहे. याशिवाय या बॅरेजमधून अतिरिक्त ३२३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे शेतीही ओलिताखाली येणार आहे.वाळूअभावी काम रेंगाळलेकेवळ १० टक्के बांधकाम बाकी असून तेही काम रेती अभावी रेंगाळल्याची चर्चा आहे. या नदीच्या रेती घाटावरून शेकडो ट्रक रेतीचा अवैध उपसा होत असून कित्येक ट्रक रेती जप्त करण्यात आली आहे. शासनाने या बॅरेजच्या कामासाठी रेती उपलब्ध करून दिल्यास बॅरेजचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीwater shortageपाणीटंचाई