कृषी विभागाचा शेतीपयोगी उपक्रमहिंगणघाट : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत कीड रोग सल्ला सनियंत्रण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात उपविभागातील हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात प्रत्येकी पाच कीड सर्वेक्षक नेमण्यात आले आहेत.खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकावर येणाऱ्या किडीचे निरीक्षण करण्यात येत आहे. त्या निरीक्षणाच्या आधारे शेतकऱ्यांना किसान एसएमएसद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. कापूस पिकाच्या पाहणीत पिकावरील तुडतुडे आणि फुलकिडच्या नियंत्रणाकरिता सायपरमेथ्रीन २५.४ मिली १० लिटर पाण्याच्या मिसळून फवारावे, पांढरीमाशी नियंत्रणासाठी फिप्रोनील ५ एस सी २० मिली १० लिटर पाण्यात किंंवा बुप्रोफेजीन २५ एस सी १३ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पावर स्प्रेने फवारणी करीत असल्यास कीटकनाशकची मात्रा तीन पट वाढवावी. मिलीबग आढळून आल्यास गाजर गवत आणि तनाचा नायनाट करावा, असा सल्ला कृषी विभागामार्फत देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा लाभ घेण्याकरिता कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)
कीड रोग सल्ला नियंत्रण प्रकल्प
By admin | Updated: September 27, 2015 01:38 IST