शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावर महिलांची बदनामी करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:07 IST

फेसबुकवर महिलांचे खोटे आयडी तयार करून बदनामी करणारा मजकूर टाकणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने नांदेड येथून अटक केली. मच्छिंद्र बळीराम कावडे (३७) रा. इश्वरनगर नांदेड, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देफेसबुकवरून घेत होता महिलांचे फोटो व माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : फेसबुकवर महिलांचे खोटे आयडी तयार करून बदनामी करणारा मजकूर टाकणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने नांदेड येथून अटक केली. मच्छिंद्र बळीराम कावडे (३७) रा. इश्वरनगर नांदेड, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०१७ रोजी महिलेच्या तक्रारवरून माहिती तंत्रज्ञान कायदा सहकलम ६७ तथा भादंविच्या कलम ५०१ अन्वये गुन्हा दााखल करण्यात आाला होता. यात ज्ञात आरोपीने फिर्यादीच्या नावाने खोटे फेसबुक अकाऊंट तयार करून बदनामीकारक मजकूर टाकला. या प्रकरणी सिंदी रेल्वे व सायबर पोलीस ठाणे वर्धाने त्वरित तपास करीत बदनामीकारक फेसबुक अकाऊंट बंद करून आरोपीचा शोध सुरू केला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही सदर आरोपी वेळोवेळी फिर्यादी व तिच्या संबंधित व्यक्तीच्या नावाने खोटे फेसबुक अकाऊंट तयार करून त्यांची बदनामी करण्याचे काम करीत होता. आरोपी हा फेसबुकसोबतच व्हॉटस् अ‍ॅपद्वारेही फिर्यादी व तिच्या संबंधित व्यक्तींना त्रास देत होता.याप्रकरणी फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप व मोबाईल कंपन्यांकडून माहिती घेतली असता आरोपी नांदेड येथे वास्तव्यास असल्याचे कळले. त्याची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी पोलीस पथक नांदेड येथे रवाना झाले. सायबर पोलीस ठाण्याने तांत्रिक पद्धतीने असलेल्या या गुन्ह्याचा तपास करून आरोपी मच्छिंद्र बळीराम कावडे (३७) रा. इश्वरनगर नांदेड याला शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. त्याला तपासी अधिकाऱ्यांसमक्ष हजर करण्यासाठी वर्धा येथे आणण्यात आले. अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये बरीच माहिती आढळून आली.प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फॉरेन्सीक रिपोर्टवरून अधिक माहिती घेण्यात येत आहे. संबंधित पीडित महिलांना पोलिसांमार्फत संपर्क करण्यात येत असून त्यावरून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. प्रकरणाचा पुढील तपास सिंदी (रेल्वे) पोलीस करीत आहे.

फेसबुकवरून घेत होता महिलांचे फोटो व माहितीआरोपी मच्छिंद्र कावडे हा फेसबुक व व्हॉटस् अ‍ॅपवरून महिलांचे फोटो व त्यांची माहिती घेत होता. त्यांच्याशी महिला म्हणून चॅटींग करून त्यांचे व त्यांच्या परिवाराबाबत तथा मित्रपरिवाराबाबत माहिती घेत होता. त्यांना संपर्कही करीत होता. शिवाय पीडितेची बदनामी करणारे मॅसेज, अश्लील फोटो, व्हीडीयो व्हॉटस् अ‍ॅपवर प्रसारित करीत होता. याच दरम्यान त्याला फिर्यादीच्या फेसबुकवरून तिचा फोटो मिळाला. त्याने तिचे खोटे अकाऊंट तयार करून तिला व तिच्या संबंधित व्यक्तींना त्रास देणे सुरू केले. त्याच्या मोबाईलमध्ये मुंबई, पुणे, गोवा, लातूर, बीड, नांदेड, नागपूर, गडचिरोली व वर्धा येथील अनेक महिलांचे फोटो सापडलेत. बऱ्याच महिलांसोबत तो व्हॉटस् अ‍ॅप व फेसबुकद्वारे अश्लील चॅटींग करीत असल्याचे उघडकीस आले.

सोशल मिडीयावरील अकाऊंट स्वत: वापराआपले फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपचे फोटो, व्हीडीयो आपल्या कॉन्टॅक्टमधील लोकांशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तीला दिसू नये म्हणून सोशल नेटवर्कींग साईटवर सेटींग पुरविण्यात येत असते. याबाबत अनेकांना ज्ञान नसल्याने असे गुन्हे घडून महिलांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी वर्धा पोलिसांकडून नेहमी जनजागृती केली जाते. याबाबत अधिक माहितीकरिता वर्धा पोलीस फेसबुक पेज, टष्ट्वीटर हॅन्डलवर फॉलो करण्याचे आवाहन वर्धा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया