शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

आॅनलाईन फसवणाऱ्याला गुजरात येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:23 IST

बँकेचा ओटीपी घेवून दोन लाख रुपयांचा आॅनलाईन गंडा घालणाºयाला वर्धा पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. अटकेत असलेला आरोपी हा आॅनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार करणाऱ्या फिर्यादीचाच मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे.

ठळक मुद्देतक्रारदाराचा सहकारीच निघाला चोर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बँकेचा ओटीपी घेवून दोन लाख रुपयांचा आॅनलाईन गंडा घालणाºयाला वर्धा पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. अटकेत असलेला आरोपी हा आॅनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार करणाऱ्या फिर्यादीचाच मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे. धर्मेंदकुमार राजेंद्रप्रसाद वर्मा (२५) रा. पालेगंग, पटना (बिहार) ह.मु. उमरगाव, गुजरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस सुत्रानुसार, प्रशांत कवडुजी भोयर (२९) रा. वासी (कोरा) ता. समुद्रपूर हा हासनराईजर कन्टेनर कंपनी, डेहरी गाव (गुजरात) येथे नोकरीला आहे. त्याचे हिंगणघाट येथील भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. त्याच्या खात्यातून १५ मार्च २०१८ ते १६ मार्च २०१८ दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने आॅनलाईन पद्धतीने २ लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन केल्याचे निदर्शनास आले. यावरून त्याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या कलम ४२०, सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा सुधारित सन (२००८) अन्वये गुन्हा दाखल केला.सदर गुन्ह्याचा तपास हा तांत्रिक स्वरूपाचा असल्याने सायबर पोलीस स्टेशन तर्फे याचा समांतर तपास करण्यात आला. तपासादरम्यान माहिती मिळाली की, प्रशांत भोयर याचे मोबाईल सीम घटना काळात बंद झाले. त्यामुळे त्याच्या मोबाईलवर येणारे बँकेचे मॅसेज बंद होते. यामुळे तो या फसवणुकीसंबंधी अनभिज्ञ राहिला. दोन-तीन दिवसांनंतर त्याने बंद झालेले सीम पुन्हा सुरू केले असता सदर फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आला.या माहितीवरून सदर ट्रान्झॅक्शन हे उमरगाव, गुजरात म्हणजेच फिर्यादीचे राहते जागेवरूनच झाल्याचे निष्पन्न झाले. यातील आरोपीने प्रशांतचे सीम कार्ड चोरून त्याचा वापर करून सदर ट्रान्झॅक्शन केल्याचे तपासात उघड झाले. यावरून तात्काळ पोलीस पथक उमरगाव गुजरात येथे धडकले. मोबाईल धारक धर्मेंदकुमार वर्मा नामक व्यक्तीला चौकशीकरिता ताब्यात घेतले. त्याला अधिक विचारपूस केली असता तो प्रशांतच्या रूमवर राहत असून त्याच्याच कंपनीमध्ये काम करीत असल्याचे समोर आले. त्याला प्रशांतने आपले एटीएम कार्ड काही कामाकरिता दिले असता त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले. धर्मेद्रकुमार याने सदर रक्कम आॅनलाईन पद्धतीने त्याच्या बिहारमधील अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केल्याचे कळले. हा प्रकार केल्यानंतर काही काळानंतरच त्याने कंपनी सोडण्याकरिता अर्ज दिलेला असून गुजरातमधून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच वर्धा पोलिसांनी त्याला अटक केली.सदर कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या निर्देशाने सहायक फौजदार अनिल वर्मा, विजय वाजपेयी, राजेंद्र हाडके, कुलदीप टांकसाळे, अमोल आलवाडकर, प्रफुल हेडाऊ यांनी केली.मित्रानेच दिला दगालग्नाचे काम असल्याने प्रशांत याने त्याचे एटीएम त्याच्या मित्राकडे विश्वासने दिले. मात्र मित्राने त्याच्या विश्वासाला दगा देत फसवणूक केल्याचा प्रकार येथे घडला.