लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील धुनिवाले मठ ते आर्वी नाका रस्त्याचे रूंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे. यात बहुतांश जोड रस्ते बंद पडले होते. आता रस्त्याचे काम पूर्णत्त्वास येत असल्याने हे रस्ते जोडण्यात येत आहे. मात्र श्री स्वामी समर्थ नगरीकडे जाणारा रस्ता अद्याप अपूर्ण आहे. या रस्त्यावर मुरारका नामक व्यक्ती रस्ता होवू देत नसल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. हा रस्ता नसल्याने नागरिकांना सुमारे अर्धा किलोमिटरचा फेरा पडतो आहे.ही समस्या लक्षात घेवून येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांचीही भेट घेतली. त्यांनी रस्त्याचे काम नियमानुसार करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला केल्या आहेत. त्यांच्या सूचनांना बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोपही निवेदन देणाऱ्यांनी केला आहे. रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदाराला तशा सूचना केल्या असून त्यांच्याकडूनही हा रस्ता झाला नाही. यामुळे या भागातील नागरिकांच्या समस्येत वाढ होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी येथील महेंद्र खडसे, रमेश गोळे, संजय जानोतकर, शेखर जानोतकर, आकाश बल्लमवार, महेश शिरभाते, संजयसिंह मोरे, यशवंत देशपांडे यांनी केली आहे. ही समस्या मार्गी काढण्याकरिता यापूर्वीही या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना साकडे घातले होते. यावेळी अधिकाºयांकडून पाहणी करण्यात आली; मात्र काहीच मार्ग काढण्यात आला नसल्याने नागरिकांची समस्या आजही कायम आहे.
स्वामी समर्थ नगरीतील नागरिकांची रस्त्यासाठी तगमग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:55 IST
येथील धुनिवाले मठ ते आर्वी नाका रस्त्याचे रूंदीकरण आणि सिमेंटीकरण सुरू आहे. यात बहुतांश जोड रस्ते बंद पडले होते. आता रस्त्याचे काम पूर्णत्त्वास येत असल्याने हे रस्ते जोडण्यात येत आहे. मात्र श्री स्वामी समर्थ नगरीकडे जाणारा रस्ता अद्याप अपूर्ण आहे.
स्वामी समर्थ नगरीतील नागरिकांची रस्त्यासाठी तगमग
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही बगल : एका घराकरिता इतरांना त्रास