शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

न्यायिक मागण्यांसाठी पेन्शनधारक रस्त्यावर, मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 14:58 IST

न्यायिक मागण्यांसाठी गुरुवारी निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडक दिली.

वर्धा : न्यायिक मागण्यांसाठी गुरुवारी निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडक दिली. स्थानिक झाशी राणी चौकातून काढण्यात आलेला मोर्चा दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचल्यावर तो पोलिसांनी अडविला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा लाभ पेन्शन धारकांना देण्यात यावा. ईपीएफओच्या पेन्शनर विरोधी तसेच कोर्ट निर्णय विरोधी भूमिकेच्या विरोधात देशातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये पेन्शनरांचे दावे दाखल आहेत. ती सरकारसाठी चांगली गोष्ट नाही. उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये निवृत्त पेन्शन धारकांनी जे योगदान दिले त्याच्याच भरवशावर आज देश महाशक्ती बनू पाहत आहे. परंतु अशाच पेन्शन धारकांवर सध्या उपाशी राहण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधींच्या मानधनात भरघोस वाढ केली जात आहे.सर्व ईपीएस पेन्शनधारकांना किमान नऊ हजार रुपये महागाई भत्ता व पेन्शन देण्यात यावी. अंतर्गत वाढीसाठी त्वरित प्रयत्न करण्यात यावे. कमिटी क्र. १४७ अन्वये पेन्शन आणि महागाई भत्ता लागू करावा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दोन्ही प्रकारच्या कर्मचा-यांना भेदभाव न करता विना अट लागू करण्यात यावा. सर्वांच्या आरोग्यासाठी ईएसआय लागू करून ईएसआय व्यवस्था सक्षम करण्यात यावी. कम्युटेशन रक्कम पुनर्स्थापित करण्यासाठी सीबीटीचा जो पूर्वी दिलेला निर्णय लागू करण्यात यावा.पेन्शन कम्युटेशन आणि आरओसी सुविधा पुनश्च लागू करण्यात यावी. पेन्शन धारकांना सुविध व्हावी म्हणून जीवन प्रमाणपत्रची कार्यवाही स्थानिक बँक खात्यांद्वारे करण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केल्या. सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सादर केले. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रकाश येंडे, भिमराव डोंगरे, पुंडलिक पांडे यांनी केले. मोर्चात मोठ्या संख्येने पेन्शनधारक सहभागी झाले होते.