शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

२़८० लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या

By admin | Updated: February 9, 2015 23:17 IST

भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील ६८ टक्के बालकांत आतड्याचा कृमी दोष आढळतो़ हा मातीतून प्रसारित जंतामुळे होतो. जगात २८ टक्के बालकांना असा कृमी दोष होण्याची शक्यता असते.

वर्धा : भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील ६८ टक्के बालकांत आतड्याचा कृमी दोष आढळतो़ हा मातीतून प्रसारित जंतामुळे होतो. जगात २८ टक्के बालकांना असा कृमी दोष होण्याची शक्यता असते. यामुळे राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेत जिल्ह्यात २ लाख ८० हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे़राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेकरिता नागपूर विभागातून वर्धा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे़ यात वय वर्ष १ ते १९ च्या शासकीय, अनुदानीत शाळा, अंगणवाड्या व शाळाबाह्य मुलांना जंतनाशक गोळ्यांची मात्रा देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ८० हजार ५४७ लाभार्थ्यांचा यात समावेश होईल़ जंतनाशक गोळी जेवण झाल्यानंतर घ्यायची असून काही दुष्परिणाम आढल्यास प्राथमिक आरोग्य केंद, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांत संपर्क साधावा़ आरोग्य विभागाच्या सहकार्याने जंतनाशक ‘अल्वेडाझोल’ गोळी देऊन आरोग्य, पोषणस्थिती व शिक्षणांचा दर्जा उंचावणे, हा उद्देश आहे. सुटलेल्या मुलांना १३ फेब्रुवारी रोजी गोळी दिली जाईल़ आरोग्य, शिक्षण व एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)