शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

‘त्या’ बिल्डरवर दंडात्मक कारवाई

By admin | Updated: November 11, 2015 01:33 IST

खैरी शिवारात नागपूरच्या बिल्डरने शेती विकत घेतली. तेथील विहिरीवर मोटारपंप लावून वीज तारावर हूक टाकून गत सहा महिने ओलित केले.

वीज चोरी प्रकरण : वायर, पेटीही जप्त, कारवाईला संशयाचे वलयसेलू : खैरी शिवारात नागपूरच्या बिल्डरने शेती विकत घेतली. तेथील विहिरीवर मोटारपंप लावून वीज तारावर हूक टाकून गत सहा महिने ओलित केले. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी वृत्त प्रकाशित केली. वृत्त उमटताच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत तेथील साहित्य ताब्यात घेतले. शिवाय ११ हजार ५६० रुपयांचा दंड बिल्डरकडून वसूल केला. असे असले तरी दहशत व अर्थपूर्ण संबंधामुळे ही कारवाई शंका निर्माण करणारी आहे. यामुळे शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे.नागपूरच्या पाठक नामक बिल्डरने खैरी शिवारात दहा एकर शेती विकत घेतली. तेथील विहिरीची दुरूस्ती करून मोटारपंप लावला. शेतात बंगला बांधला. कोणतेही पीक न घेता छंदासाठी फळांची व शोभेची झाडे लावली. अधिकृत वीज जोडणी न घेताच वीज वितरण कंपनीच्या तारावर हुक टाकून सहा महिन्यांपासून विजेची चोरी करीत झाडांना पाणी दिले. या चोरीची सचित्र माहिती एका शेतकऱ्याने ‘व्हाट्स अ‍ॅप’वर सेलूचे उपकार्यकारी अभियंता संजय पुरी यांच्या मोबाईलवर पाठविली. १०-१५ दिवसांचा कालावधी लोटूनही कारवाई करण्यात आली नाही. अखेर सदर शेतकऱ्याने ही बाब लोकमतच्या निदर्शनास आणून दिली. उपकार्यकारी अभियंता संजय पुरी यांना संबंधित वृत्तासाठी प्रतिक्रीया घेण्यास्तव भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता अधिनस्थ अधिकाऱ्यांना पाठवून कारवाई करतो, असे सांगितले. यानंतर त्वरित रेहकीचे कनिष्ठ अभियंता ए.आर. गजभिये यांना घटनास्थळी पाठविले; पण अभियंता, लाईनमन मोहरकर, कुंदारे थेट घटनास्थळाकडे निघाले. जाताना त्यांनी झडशी येथे वेळ घालविला. सदर बिल्डरला सूचना देऊन हुकांसह वायर खाली ओढून घेण्यास भ्रमणध्वनीवर सूचना केली. यानंतर वरातीमागून घोडे हाकत ही चमू घटनास्थळी पोहोचली. हुका तारावर नव्हत्या, असा देखावा निर्माण करीत हुकांसह वायर, खांबावरील पेटी जप्त केली; पण विहिरीतील मोटारपंप जप्त केला नाही. लोकमतमध्ये वृत्त झळकताच उपकार्यकारी अभियंता संजय पुरी यांनी कनिष्ठ अभियंता गजभियेसह घटनास्थळी जावून पंचनामा केला. ही कारवाई प्रचंड राजकीय दबावाखाली करण्यात आली. सहा महिने अवैध वीज पुरवठा वापरूनही केवळ ८ हजार ५६० रुपये बिलापोटी व तीन हजार रुपये कंपाऊंड चार्जेस, असे ११ हजार ५६० रुपयांचे नाममात्र बिल माणिक मनोहर पाठक यांच्या नावे दिले. शेतकऱ्याने हा प्रकार केला असता तर इभ्रतीचे धिंडवडे काढत पोलीस कारवाईची भीती दाखवून मनमानी दंड वसूल केला असता. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)अधिकृत वीज असताना शेतकऱ्याला दंडशेतकऱ्याकडे अधिकृत वीज पुरवठा असताना मंजूर क्षमतेपेक्षा अधिक (एच.पी.) अश्वशक्तीची मोटार लावून वापर केल्याप्रकरणी भरमसाठ दंड वसूल केल्याच्या घटना ताज्या आहे. राजकीय वजनातून एका बिल्डरवर थातूरमातूर दंडाची कारवाई सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांच्या मनात वीज वितरण कंपनीविरूद्ध संताप निर्माण करणारी आहे. वीज चोरीची सचित्र माहिती एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर १०-१५ दिवसानंतरही काहीच कारवाई न होणे, हेच राजकीय दबाव असल्याचे जिवंत उदाहरण असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.लोकमतने भ्रमणध्वनीवर माहिती देताच मी माझ्या अधिनस्थ कनिष्ठ अभियंत्याला कर्मचाऱ्यासह घटनास्थळी सोमवारी रात्रीच पाठविले व कारवाई केली. त्यांच्या सांगण्यानुसार तारावरून हुका काढलेल्या होत्या; पण वीज चोरी होत असल्याबाबत पुरावा असल्याने वायर व पेटीसह साहित्य जप्त केले व दंडात्मक कारवाई केली.- संजय पुरी, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, सेलू.या चोरी प्रकरणी उपकार्यकारी अभियंत्यानी सांगताच मी सोमवारी घटनास्थळी जावून कार्यवाही केली. वायर, पेटी व साहित्य जप्त केले. पाण्यातील मोटार जप्त केली नाही. मंगळवारी उपकार्यकारी अभियंता पुरी यांच्यासह घटनास्थळी जावून पंचनामा करण्यात आला.- ए.आर. गजभिये, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण कंपनी, रेहकी.