शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 23:40 IST

लोकसभा निवडणुकीतील मतदानाअंती विविध चर्चा रंगल्या होत्या. ग्रामीण भागात भाजप सरकारविरुद्ध असलेला रोष काँग्रेसला मदत करणारा ठरेल, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातही आशा पल्लवित झाली होती. परंतु, सकाळपासून लागलेल्या धक्कादायक निकालाने काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले.

ठळक मुद्देस्थानिक नेत्यांसह पदाधिकारीही दिसेना : कार्यालयापुढील मंडपात केवळ वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीतील मतदानाअंती विविध चर्चा रंगल्या होत्या. ग्रामीण भागात भाजप सरकारविरुद्ध असलेला रोष काँग्रेसला मदत करणारा ठरेल, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातही आशा पल्लवित झाली होती. परंतु, सकाळपासून लागलेल्या धक्कादायक निकालाने काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले.काँग्रेसच्या उमेदवार महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांच्या निवडणुकीची सूत्रे रामनगरातील जनसंपर्क कार्यालयातूनच हलविण्यात आली. आजही मतमोजणीच्या दिवशी काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यालय असलेल्या सद्भावना भवनाला सकाळपासून कुलूप होते. तर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कापडी मंडप टाकण्यात आला होता. मतमोजणी असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्तेही जोमात होते. नव्या उमेदीने निवडणुकीच्या निकालाकडे त्यांचे लक्ष लागले होते. परंतु, पहिल्याच फेरीत भाजपचे रामदास तडस यांनी ७ हजार ८१६ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतरच्या सर्वच फेरीत भाजपचे उमेदवार आघाडीवर राहिल्याने आपसुकच काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शांतता पसरत गेली. त्यामुळे दुपारच्या सुमारास कार्यालयाकडे फेरफटका मारला असता कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.सोबतच जनसंपर्क कार्यालयापुढे टाकलेल्या कापडी मंडपात केवळ वाहनेच दिसून आली. पाच वर्षांत ओसरलेली मोदी लाट त्सुनामीच्या वेगाने आल्याने काँग्रेसचे मताधिक्य सर्वत्र वाहून गेले.यातून गांधी जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांनाही पराभव पत्करावा लागला. पराभवाचा परिणाम जनसंपर्क कार्यालयातील वातावरणातून सकाळपासूनच दिसून येत होता. मतमोजणीच्या फेऱ्यातील मताधिक्याची तफावत लक्षात घेत दुपारपर्यंतच निवडणुकीतील चित्र स्पष्ट होताच अनेक कार्यकर्त्यांनी घराचा रस्ता धरला होता.स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क कार्यालयात न येता आपापल्या निवासस्थावरूनच मतमोजणीतील मताधिक्याचा आढावा घेतला.पहिल्या फेरीपासूनच मावळत गेली आशामतदार संघातील मतदानाचा कौल लक्षात घेता कोणताही पक्ष विजयाचा दावा करू शकत नव्हता. त्यामुळे काँग्रेसलाही विजयाची आशा होती. पण, पहिली फेरीच काँग्रेसला ७ हजार ८१६ मताने पिछाडीवर घेऊन गेली. त्यांनतरच्या प्रत्येक फेरीत काँग्रेसला कमी मते मिळत गेल्याने स्थानिक नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आशा मावळत गेली. शेवटी मतदारांनी दिलेला कौल मान्य करण्याशिवाय काँग्रेसकडे दुसरा पर्याय राहिला नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल