शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कृपलानीने केलेला कराचा भरणा अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:45 IST

कृपलानी यांनी केलेले बांधकाम अवैध असल्याचे पालिकेने नोटीसमध्ये नमूद केले आहे. निबंधक कार्यालयात एकाच क्रमांकावर दोन विक्री झाल्या आहेत त्यामुळे पहिले ज्यांची विक्री झाली ती वैध मानली दुसऱ्यांदा त्याच क्रमांकावर झालेल्या विक्रीला दुरूस्त करावे लागते.

ठळक मुद्देपालिकेचा फेरफार अडचणीत : इमारत पाडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृपलानी यांनी केलेले बांधकाम अवैध असल्याचे पालिकेने नोटीसमध्ये नमूद केले आहे. निबंधक कार्यालयात एकाच क्रमांकावर दोन विक्री झाल्या आहेत त्यामुळे पहिले ज्यांची विक्री झाली ती वैध मानली दुसऱ्यांदा त्याच क्रमांकावर झालेल्या विक्रीला दुरूस्त करावे लागते. त्याशिवाय त्या अवैध ठरतात शिवाय त्याचा फेरफार घ्यावा लागतो. तसेच कृपलानी यांनी कर वाचविण्यासाठी पूनम यांच्या नावे मालमता खरेदी केली त्यानंतर ती नातेसंबधातच कर न भरता बक्षीसपत्र केल्याचे भासविले परंतु त्यांची रजिस्ट्री केली नाही. त्यामुळे तेही अवैध आहे. पालिकेने याप्रकरणी कराची आकारणी कशाच्या आधारावर केली, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.पालिकेने कृपलानीला दिलेल्या कर पावतीवर विक्रम अशोक कृपलानी व अशोक कृपलानी यांचे नाव आहे. त्यांचे नाव कर आकारण्यात कसा आला. कागदपत्र कुणी तपासले कृपलानीचे कोणतेही कागदपत्र न तपासता पालिकेने कराची वसूली केली कशी हा प्रश्न निर्माण होतो. कृपलानीच्या आर्थिक साम्राज्यापुढे पालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी नांगी टाकल्याचे दिसून येत आहे.२४०० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात, तरी पालिका ढीम्मचकेसरीमल कन्या शाळा, भरत ज्ञान मंदिरम व आणखी एका कॉन्व्हेंटचे मिळून २४०० विद्यार्थी या महामार्गावरून दररोज ये-जा करतात. त्यांना सोडण्यासाठी येणारे आॅटो व बसेसची संख्या २५ च्या घरात आहे. सकाळी, दुपारी व सायंकाळी या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. शिवाय कृपलानीच्या टायर दुकानातही दररोज शेकडो वाहने येतात. त्यामुळे ही अवैध इमारत पाडणे आवश्यक आहे. शहरातील लहान सहान व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करताना कृपलानी सारख्यांना अभय का हा प्रश्न नागरिकांनी केला आहे. नगर पालिकाचे पदाधिकारी याप्रकरणी मौन बाळगून आहे. आपण इमारत जमीनदोस्त करून असे मुख्याधिकाºयांनी सांगितल्याचे तक्रारकर्ते सुरेश पट्टेवार यांनी म्हटले आहे तर मुख्याधिकाºयांना इमारत पाडण्याबाबत कारवाई करण्यास रोखले कुणी हा खरा प्रश्न आहे.